बॉलिवूड क्वीन कंगना राणौत, टीव्ही अभिनेत्री हिना खान यांच्यानंतर बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019च्या रेड कार्पेटवर दिमाखदार अंदाजात एंन्ट्री घेत, अनेकांना घायाळ केले. दीपिका गत दोन वर्षांपासून या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असून यंदाचे हे तिचे हे तिसरे वर्ष आहे. पण गत दोन वर्षांच्या तुलनेत दीपिकाचा यंदाचा अंदाज हटके ठरला.
रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधल्यावर दीपिका यंदा पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार होती. त्यामुळे तिच्या यंदाच्या लुककडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019साठी दीपिकाने पीटर डंूडासने डिझाईन केलेल्या आॅफ व्हाइट कलरच्या डीप नेक गाऊनची निवड केली. तिच्या या ड्रेसचे मुख्य आकर्षण होते, ते त्यावरचा ब्लॅक बो.
या ग्लॅमरस ड्रेससोबत मोठे डायमंड इयरिंग्स. शिमरी ब्रेसलेट, पिंक लिप्स, ग्लोर्इंग मेकअप आणि हाय पोनीटेलने तिने हे लूक कम्पिट केले. कातिच्या तुम्हाला ठाऊक आहेच की, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने ‘लॉरियल’ कंपनीची अॅम्बेसिडर म्हणून हजेरी लावली.
पती रणवीर सिंग झाला खल्लास...दीपिकाचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019मधील लूक पाहून पती रणवीर सिंग पुरता खल्लास झाला. दीपिकाच्या प्रत्येक फोटोवर त्याने एकापेक्षा एक भारी कमेंट्स केलेत. एका फोटोवर कमेंट करताना ‘और पास’ असे त्याने लिहिले. तर अन्य एका फोटोवर ‘’ अशी कमेंट केली.