Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला पोलिसांत तक्रार करायची...', आदित्यनं ज्या व्यक्तीचा फोन फेकला त्याची प्रतिक्रिया आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:58 IST

नुकतेच पार पडलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यने चाहत्याला मारहाण करत त्याचा मोबाईल फेकून दिला.

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आणि गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या चर्चेत असतो.  नुकतेच पार पडलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यने चाहत्याला मारहाण करत त्याचा मोबाईल फेकून दिला. आदित्य नारायणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स त्याच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. आता यातच ज्या व्यक्तीचा आदित्यने फोन फेकला त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

लोकेश चंद्रवंशी असे त्या तरुणाचे नाव आहे. आपण फक्त सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होतो, असे त्यानं सांगितलं. तो म्हणाला, 'आदित्य तिथे सगळ्यांना सेल्फी देत ​​होता. मी स्टेजच्या अगदी समोर होतो. त्यामुळे मीदेखील सेल्फीसाठी फोन दिला, पण आदित्यला अचानक काय झालं, त्याने माझ्या हातावर माइक मारला आणि माझा फोन फेकून दिला'. तसेच मला पोलिसांत तक्रार करायची नाही, असेही त्यानं सांगतिलं. सबंधित तरुण हा रुंगटा कॉलेजमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

नेमकं काय झालं?

आदित्य नारायण छत्तीसगडमधील भिलाई येथे एका कॉलेज कॉन्सर्टला गेला होता. त्यावेळी स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत असतानाच अचानक त्याने एका फॅनला माइक मारला. तसेच त्याचा फोन हिसकावून फेकून दिला व पुढे आपले गाणे सुरु ठेवले.  या व्हिडिओत आदित्य शाहरुख खानच्या डॉन सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे. त्यादरम्यानच स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या चाहत्याला आदित्य मारतो. त्यानंतर त्याच्या हातातील फोन घेतो आणि फेकून देत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

सध्या सोशल मीडियावर आदित्य नारायणचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स त्याच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. तर दुसरीकडे या घटनेवर त्याच्या इव्हेंट मॅनेजरने प्रतिक्रिया दिली.  आदित्यचला तो खूप त्रास देत होता. त्याने अनेक वेळा आदित्यच्या पायावर फोन मारला आणि मग आदित्यला राग आल्याचे इव्हेंट मॅनेजरने सांगितले. तर यावर 'खरं सांगायचं तर मला यावर काहीच बोलायचे नाही, मी केवळ देवाला उत्तर देण्यास बांधील आहे... बस आता मी एवढंच बोलू शकतो...’, अशी  प्रतिक्रिया देआदित्य नारायणने दिली आहे.

टॅग्स :आदित्य नारायणउदित नारायणसेलिब्रिटीसोशल मीडिया