Join us

'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:04 IST

Karishma Sharma Local Train Accident: 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री करिश्मा शर्माने मुंबईत धावत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Karishma Sharma Accident: 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री करिश्मा शर्मा(Karishma Sharma)ने मुंबईत धावत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती चर्चगेट येथे शूटिंगसाठी जात होती. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. आता तिने ही नेमकी घटना कशी घडली, याबद्दल सांगितले.

करिश्मा शर्मा म्हणाली की, ''मला ट्रेनच्या आत शूटिंग करायचे होते. जेव्हा मी ट्रेनमध्ये चढत होते, तेव्हा माझे फ्रेंड्स खूप हळू येत होते आणि जेव्हा ते माझ्यामागे चढले नाहीत, तेव्हा मी घाबरून गेले. जशी ट्रेन सुरू झाली, मी चुकीच्या दिशेने उडी मारली आणि मी पाठीवर प्लॅटफॉर्मवर पडले. माझे डोके आपटले आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर, मला काही क्षणच आठवतात. मला आठवतंय की पोलीस आले, स्टेशनवर अनेक वेळा उलटी झाली आणि मग मला रुग्णालयात नेण्यात आले.''

अभिनेत्रीचा पायही तुटू शकला असताकरिश्मा शर्माने सांगितले की, ''हा अपघात आणखी गंभीर होऊ शकला असता. माझ्या फ्रेंड्सनी नंतर सांगितले की मी ट्रेनच्या खूप जवळ पडले होते. जर मी एक-दोन इंच आणखी जवळ घसरले असते, तर माझे दोन्ही पाय तुटले असते किंवा त्याहून वाईट काहीतरी होऊ शकले असते.'' अभिनेत्रीने सांगितले की, ''या अनुभवामुळे ती कोलमडून गेली आहे. मी सहजासहजी रडणाऱ्यांपैकी नाही, पण त्या दिवशी मी माझ्या आईशी फोनवर बोलताना रडले. ती लगेच पटनाहून आली. दुसऱ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला, पण वेदना होत असल्यामुळे आणि मी लोकांचे बोलणे विसरू लागल्यामुळे मला पुन्हा रुग्णालयात जावे लागले.''

करिश्मा शर्मा शूटिंगसाठी गेली होती करिश्मा शर्माने पुढे सांगितले की, तिने इतकी वेदनादायक घटना कधीच पाहिली नाही. तिने लोकांना प्रवासादरम्यान काळजी घेण्यास सांगितले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर सांगितले होते, ''काल, चर्चगेटला एका शूटसाठी जाताना, मी साडी नेसून ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. जशी मी ट्रेनमध्ये चढले, पण गती वाढली आणि माझे फ्रेंड्सही चढले नाहीत. मी पण उडी मारली ज्यामुळे मला दुखापत झाली.''

टॅग्स :करिश्मा शर्मामुंबई लोकलअपघातबॉलिवूड