सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'बॉर्डर २' सिनेमा आज जगभरात रिलीज झाला आहे. 'बॉर्डर २' पाहण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक उत्सुक होते. अशातच आज 'बॉर्डर २' रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर (x) प्रेक्षकांनी 'बॉर्डर २' पाहून त्यांचं मत व्यक्त केलंय. 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या
एका प्रेक्षकाने लिहिलंय की, जे.पी.दत्ता आणि अनुराग सिंग काय मिस्टरपीस बनवला आहे तुम्ही! थिएटरमधून निघताना डोळ्यांतून पाणी आलं. मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. संदेशे आते है, गाण्यावर आम्ही अक्षरशः डान्स केलाय. सोनू निगम तू कमाल केली आहेस.
एका युजरने सिनेमाला पाचपैकी साडेचार स्टार दिले आहेत. त्याने लिहिलंय की, "खरा थरार आणि अस्सल भावनांची मेजवानी! देशभक्तीपर चित्रपट कसा असावा, याचा हा एक उत्कृष्ट वस्तुपाठ आहे. यातील प्रत्येक फ्रेम आपल्या सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करते. सनी देओल आपल्या जबरदस्त ऊर्जेसह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतला आहे!"
एका युजरने लिहिलंय की, "नुकताच 'बॉर्डर २' पाहिला. व्हीएफएक्स (VFX) मधील काही चुकांकडे दुर्लक्ष केल्यास, चित्रपट खरोखरच उत्तम आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना अचूक हात घालतो, त्यामुळे तो नक्कीच 'ब्लॉकबस्टर' ठरेल!"
एकूणच प्रेक्षकांना 'बॉर्डर २' सिनेमा आवडलेला दिसतोय. आज २३ जानेवारी २०२६ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 'अॅनिमल', 'पुष्पा २', 'धुरंधर' नंतर आता 'बॉर्डर २' हा ३ तासांपेक्षा जास्त लांबीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही जोमाने सुरू असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Sunny Deol's 'Border 2' released globally, sparking positive audience reactions. Viewers praised the screenplay, acting, and emotional impact, with many calling it a must-watch tribute to the armed forces, despite minor VFX flaws. Advance booking is strong.
Web Summary : सनी देओल की 'बॉर्डर 2' विश्व स्तर पर रिलीज़ हुई, दर्शकों की सकारात्मक प्रतिक्रियाएँ मिलीं। दर्शकों ने पटकथा, अभिनय और भावनात्मक प्रभाव की प्रशंसा की, कई लोगों ने इसे सशस्त्र बलों को श्रद्धांजलि कहा, कुछ VFX त्रुटियों के बावजूद। एडवांस बुकिंग मजबूत है।