१९९७ मधील आयकॉनिक 'बॉर्डर' चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'बॉर्डर २' सध्या चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने एक मोठी कामगिरी केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) या चित्रपटाला एकही 'कट' न लावता 'U/A' प्रमाणपत्र दिले आहे. याशिवाय 'बॉर्डर २' चित्रपटाची लांबी सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे 'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करायला जाताय, तर ही बातमी वाचा.
चित्रपटाची लांबी किती?
'बॉर्डर २' हा एक भव्य युद्धपट असून त्याची लांबी ३ तास १६ मिनिटे (१९६ मिनिटे) इतकी आहे. सामान्यतः इतक्या लांब चित्रपटांमध्ये सेन्सॉर बोर्ड काही बदल किंवा कट्स सुचवते, मात्र या चित्रपटाच्या बाबतीत बोर्डाने कोणताही बदल सुचवलेला नाही. चित्रपट निर्मात्यांनी ज्या पद्धतीने युद्धप्रसंग आणि भावना मांडल्या आहेत, त्यामध्ये कोणताही बदल न करता चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ३ तास १६ मिनिटे प्रेक्षकांंना भव्य सिनेमा बघता येणार आहे.
'बॉर्डर २' या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा आपल्या जुन्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांज आणि अहान शेट्टी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जे.पी. दत्ता, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी याची निर्मिती केली आहे.
'बॉर्डर २' येत्या २३ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'अॅनिमल', 'पुष्पा २', 'धुरंधर' नंतर आता 'बॉर्डर २' हा ३ तासांपेक्षा जास्त लांबीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही जोमाने सुरू असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : The highly anticipated 'Border 2,' a sequel to the 1997 hit, receives a U/A certificate without cuts. The war film boasts a runtime of 3 hours and 16 minutes. Starring Sunny Deol, Varun Dhawan, and others, it releases January 23, 2026.
Web Summary : 1997 की हिट फिल्म 'बॉर्डर' का सीक्वल 'बॉर्डर 2' को बिना कट के यू/ए सर्टिफिकेट मिला। युद्ध फिल्म 3 घंटे 16 मिनट लंबी है। सनी देओल, वरुण धवन अभिनीत, 23 जनवरी, 2026 को रिलीज होगी।