Sonam Bajwa:बॉलिवूडसह पंजाबी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनम बाजवा. 'एक दिवाने की दिवानियत', 'हाऊसफुल्ल-५' तसेच 'बागी-४' यांसारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. सध्या सोनम बाजवा 'बॉर्डर-२' या चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. मात्र, सोनम बाजवाने एका मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीला बॉलिवूडमधील काही चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचा खुलासा केला होता. काय होतं यामागचं कारण जाणून घेऊया...
एका मुलाखतीत अभिनेत्री सोनम बाजवाने बोल्ड आणि किसींग सीन्समुळे बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्या निर्णयाचा आजही तिला पश्चाताप होतो. 'फिल्म कंपॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत सोनम बाजवा म्हटलं होतं की, मी सुरुवातीला काही बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. मला कायम वाटायचं, पंजाबमधील माझ्या चाहत्यांना हे चालेल का आपल्याकडे चित्रपट हे कुटुंबीयांसोबत पाहिले जातात. त्यामुळे मला भीती वाटायची. लोक काय म्हणतील असे विचार डोक्यात यायचे.
मात्र, जेव्हा सोनमने तिच्या पालकांशी या विषयावर चर्चा केली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया ऐकून ती थक्क झाली. तेव्हा सोनम म्हणाली," जेव्हा मी माझ्या पालकांना याबद्दल सांगितलं तेव्हा ते अगदी सहज म्हणाले- जर ही चित्रपटाची मागणी असेल आणि कामाचा एक भाग असेल तर ते ठीक आहे. त्यांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता." असा खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.
Web Summary : Sonam Bajwa initially rejected Bollywood offers due to kissing scenes, fearing audience reaction. Her parents surprised her by being supportive, stating it's acceptable if required for the role. She regrets her initial hesitation now.
Web Summary : सोनम बाजवा ने दर्शकों की प्रतिक्रिया के डर से बोल्ड सीन के कारण शुरू में बॉलीवुड के प्रस्तावों को अस्वीकार कर दिया। उनके माता-पिता ने सहायक होकर उन्हें चौंका दिया, उन्होंने कहा कि अगर भूमिका के लिए आवश्यक हो तो यह स्वीकार्य है। अब उसे अपनी शुरुआती हिचकिचाहट का पछतावा है।