Ahan Shetty: सध्या हिंदी सिनेविश्वात 'बॉर्डर-२' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जवळपास २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बॉर्डर सिनेमाचा हा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २३ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल तसेच वरुण धवन, दिलजीत दोसांझ हे नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान प्रचंड चर्चेत आहे. बऱ्याच कालवधीनंतर अहान या चित्रपटातून कमबॅक करतो आहे. त्यात त्याची तुलना सैयारा फेम अहान पांडेसोबत करण्यात येत आहे. यावर आता अहान शेट्टीने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
अहान शेट्टी भले अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा असला तरीही इंडस्ट्रीत त्याला संघर्षाचा सामना करावा लागला. अहानने 'तडप' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, या चित्रपटाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आता एकीकडे तो बॉर्डरची चर्चा असताना सोशल मीडियावर अहान शेट्टी आणि अहान पांडे यांची तुलना केली जाते आहे. यावर बॉम्बे टाइम्स सोबत संवाद साधताना अहान शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान, अहान पांडेसोबत होणाऱ्या तुलनेवर सुनील शेट्टीचा लेक म्हणाला,"हल्ली २-३ सेकंदाच्या क्लिपमध्ये जे काही दिसेल. लोक त्यावरून अंदाज लावतात आणि मतं मांडतात. आमच्या पिढीमध्ये असे प्रकार घडताना दिसत आहेत."
"आम्हाला एकमेकांच्या विरोधात उभं केलं जात आहे. मला याची पूर्णपणे कल्पना आहे की, अहान पांडेची आणि माझी एकमेकांबरोबर तुलना केली जात आहे. मी त्याला अगदी जवळून ओळखतो. शिवाय मला हे देखील माहिती आहे त्याने या सिनेमासाठी किती मेहनत घेतली होती.यानिमित्ताने मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटतेय की, आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. शिवाय आम्ही दोघेही एकमेकांचा खूप आदर करतो. हेच सत्य आहे. आपण सगळेच या इंडस्ट्रीचा भाग आहोत." अशी प्रतिक्रिया अहान शेट्टीने या मुलाखतीत दिली.
Web Summary : Ahan Shetty, returning in 'Border-2,' addresses comparisons with Ahaan Panday. He clarified they aren't rivals, respect each other, and are part of the same industry, dismissing assumptions from short clips.
Web Summary : 'बॉर्डर-2' से वापसी कर रहे अहान शेट्टी ने अहान पांडे से तुलना पर प्रतिक्रिया दी। उन्होंने स्पष्ट किया कि वे प्रतिद्वंद्वी नहीं हैं, एक दूसरे का सम्मान करते हैं, और एक ही उद्योग का हिस्सा हैं।