Join us
Daily Top 2Weekly Top 5

Border 2: 'बॉर्डर-२' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:44 IST

‘बॉर्डर-२’ ची ग्रॅंड ओपनिंग, सनी देओलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला 

Border 2 Box Office Collection Day 1: मागील बऱ्याच दिवसांपासून  अभिनेता सनी देओलच्या बॉर्डर-२  या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.  अखेर हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच ‘बॉर्डर-२’ ने धुमाकूळ घातला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी सकारात्मकप प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, एखादा चित्रपट प्रदर्शित होताच, त्याच्या पहिल्या दिवसाची कमाई महत्वाची समजली आहे. अशातच मल्टिस्टारर बॉर्डर-२ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी किती कलेक्शन केलं याची आकडेवारी समोर आली आहे. 

‘बॉर्डर-२’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपट कसा आहे, ते सांगत आहेत. सनी देओल,  वरुण धवन,  दिलजीत दोसांझ आणि अहान पांडे  यांच्यासह इतर कलाकारांचं काम जबरदस्त आहे.बॉर्डर-२ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे.

‘बॉर्डर-२’ ची पहिल्या दिवसाची कमाई

‘बॉर्डर-२’ चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाने ३० कोटींची कमाई केली. मात्र, या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो. अनुराग सिंग दिग्दर्शित'बॉर्डर २' हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाचं काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला.शिवाय या विकेंडचा चित्रपटाला फायदा होऊ शकतो आणि चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांच्या कमाईसह या चित्रपटाने हृतिक रोशनच्या फायटरला मागे टाकलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Border 2: Exceeds expectations, earns big on opening day!

Web Summary : Sunny Deol's 'Border 2,' based on the 1971 war, opened strong. Initial estimates suggest ₹30 crore earnings on day one, surpassing 'Fighter'. Positive reviews and the Republic Day weekend boost are expected to further increase collections.
टॅग्स :सनी देओलसीमारेषाबॉलिवूडसिनेमावरूण धवनदिलजीत दोसांझबॉक्स ऑफिस कलेक्शन