बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या अपकमिंग 'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्येच त्याने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक बिहाइंड द सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने थेट सलमानच्या अविवाहित असण्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमातील 'व्याह करवा दो जी' हे गाणं अलिकडेच रिलीज झालं. हे गाणं सोशल मीडियावर गाजत असतांनाच त्याचा बिहाइंड-द-सीनचा एक व्हिडीओ वरुणने शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत सलमान खान, डेव्हिड धवन आणि मनिष पॉल दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करत वरुणने कॅप्शनमध्ये सलमानला indias biggest kunwara असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याच्यासोबत डान्स करतांनाचा अनुभव सुद्धा त्याने थोडक्या शब्दांत सांगितला आहे.
''देशातला नंबर एकचा अविवाहित मुलगा. #vyahkarwadoji त्याच्यासोबत तर डान्स करतांना कायमच भिती वाटते'', असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. वरुणने दिलेल्या या कॅप्शनमधून त्याचा थेट इशारा सलमानकडे होता हे स्पष्टपणे दिसून येतं.
दरम्यान, वरुण आणि सलमान खान यांची मैत्री फार जुनी आहे. प्रोफेशनलसोबतच वैयक्तिक आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. विशेष म्हणजे वरुणने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून एक स्पष्ट होतं की त्याच्या आगामी सिनेमात सलमान कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे. यापूर्वीही सलमानने वरुणच्या 'जुडवा 2', 'बेबी जॉन' या सिनेमात गेस्ट अपिरिअन्स दिला आहे.
Web Summary : Varun Dhawan, promoting his upcoming film, shared a behind-the-scenes video with Salman Khan, humorously calling him India's biggest bachelor. He also mentioned being intimidated while dancing with Salman. The video hints at a cameo by Salman in Varun's new film.
Web Summary : वरुण धवन ने अपनी आने वाली फिल्म का प्रचार करते हुए सलमान खान के साथ एक वीडियो साझा किया, जिसमें उन्होंने मजाकिया अंदाज में उन्हें भारत का सबसे बड़ा कुंवारा बताया। उन्होंने सलमान के साथ डांस करते हुए डर लगने का भी उल्लेख किया। वीडियो में सलमान की कैमियो की झलक दिखती है।