बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा सर्वांचा आवडता अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षय प्रत्येक प्रकारच्या सिनेमांमध्ये कायमच जबरदस्त अभिनय करताना दिसतेय. अलिकडेच अक्षय कुमार हा 'सिंघम अगेन'मध्ये झळकला. आता पुन्हा एकदा अक्षय चर्चेत आला आहे. अक्षयचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारने अलीकडेच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी अक्षयशी हस्तांदोलन करताना आणि त्याची विचारपूस करताना दिसून येत आहेत. अक्षयची भेट घेत नरेंद्र मोदी त्याला "कसा आहेस भाऊ ?" असं विचारलं. यावर अक्षयनेही त्यांची आदरपुर्वक विचारपूस केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पीएम मोदींसोबतच्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अक्षय आनंदाने पीएम मोदींकडे पाहत असून हस्तांदोलन केल्याचं दिसतंय. फोटो शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहलं, "एका कार्यक्रमात आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या". अक्षयची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
याधीही २०१९ च्या निवडणुकीत अक्षयने पीएम मोदींची मुलाखत घेतली होती. यावेळी त्याला मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय त्याच्या 'सूर्यवंशी'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान यांचा समावेश आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.