Vishal Dadlani: पावसाळा सुरु झाला की पर्यटकांना धबधब्यांची भुरळ पडते. परंतु, हल्ली धबधब्यांच्या परिसरात कचरा, प्लास्टिक आणि इतर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते, ज्यामुळे निसर्गाच्या रमणीय दृश्याची मजा काही प्रमाणात कमी होते. अशातच बॉलिवूडच्या एका लोकप्रिय गायकाने सोशल मीडियावर एका धबधब्याचा व्हिडीओ शेअर करत देत नाराजी व्यक्त केली आहे. हा गायक म्हणजे विशाल ददलानी आहे. या गायकाने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जाणारा विशाल ददलानी त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील चर्चेत असोत. नुकतीच विशाल ददलानीने कामशेत येथील एका या धबधब्याला भेट दिली. या धबधब्याच्या पायथ्याशी प्लास्टिक च्या पिशव्या, बियर, व्हिस्कीच्या, काचेच्या बाटल्या, कागदाचे तुकडे, पाणी बॉटल, अशी घाण सर्वत्र पसरली होती. ते दृश्य पाहून गायकाने संताप व्यक्त केला आहे. विशाल ददलानीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत म्हटलंय, नमस्कार मी आता महाराष्ट्रातील कामशेतमधील एका सुंदर ठिकाणी आलो आहे. शेलार हिल असं या ठिकाणाचं नाव आहे. या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलोय. परंतु, इकडे आल्यानंतर आम्ही पाहिलं तर धबधब्याच्या मागे इथे प्रचंड कचरा आहे.
त्यानंतर पुढे तो म्हणाला, "माझी सगळ्यांना विनंती आहे की,प्लीज असं करु नका. पाण्याच्या बॉटल्स, पेपर प्लेट्स अजून बऱ्याच गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत. कृपया असं करु नका. या गोष्टी आणता तर सोबत घेऊन जा कुठेही फेकून देऊ नका. महाराष्ट्र हे माझं घर आहे, असं करु नका खूप वेदना होतात." त्यानंतर विशाल संपूर्ण धबधब्याचे आजुबाजूचे सुंदर दृश्य चाहत्यांना दाखवतो. "निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपण घाणेरडे का करत आहोत? आपण #महाराष्ट्र आणि #भारत स्वच्छ केला पाहिजे. फक्त “आपण सर्वोत्तम आहोत” असे म्हणणे पुरेसे नाही. आपल्याला ते करावे लागेल." असं कॅप्शन गायकाने या व्हिडीओला दिलं आहे.
वर्कफ्रंट
विशाल ददलानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विशाल-शेखर या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेकसुपरहिट गाणी दिली आहेत. याशिवाय तो अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे.