Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'सारा अली खानने स्पॉट गर्लला ढकललं पाण्यात'; सोशल मीडियावर होतीये जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:49 IST

Sara ali khan: या व्हिडीओमध्ये सारा स्विमिंग पूलजवळ बिकिनीमध्ये उभी राहून स्पॉट गर्लसोबत फोटो काढत आहे. परंतु, फोटो काढल्यानंतर सारा अचानकपणे या मुलीला पाण्यात ढकलते.  

'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. उत्तम अभिनयासोबतच सारा तिच्या स्वभावातील नम्रपणामुळेही कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या एका प्रॅन्कमुळे ट्रोल झाली आहे. साराने मस्तीच्या मूडमध्ये स्पॉट गर्लला पाण्यात ढकललं, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला तुफान ट्रोल केलं आहे.

'वूम्पला'ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा स्विमिंग पूलजवळ बिकिनीमध्ये उभी राहून स्पॉट गर्लसोबत फोटो काढत आहे. परंतु, फोटो काढल्यानंतर सारा अचानकपणे या मुलीला पाण्यात ढकलते.  ज्यामुळे साराला ट्रोल व्हावं लागलं आहे.

दरम्यान, साराचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. अनेकांनी तिला खडे बोल सुनावले आहेत. ही काय पद्धत आहे. ती किती घाबरलेली दिसते. 'तू श्रीमंत आहेस, याचा अर्थ असं नाही की तू गरिबांसोबत कसंही वागशील', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.  तसंच या प्रमाणे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा