Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना लोकसभा निवडणूक लढणार? बॉलिवूड क्विनने केला खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:02 IST

कंगना हिने लोकसभा निवडणूक लढणार की नाही यावर स्पष्ट उत्तर दिले आहे. 

अभिनेता कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी कंगना हिने लोकसभा निवडणूक लढणार की नाही यावर स्पष्ट उत्तर दिले आहे. 

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हायरल झालेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. तिने एका हिंदी बातमीचा फोटो शेअर केला आहे. कंगनाने लिहिले की, 'मी  माझे नातेवाईक आणि मित्र मला हे पाठवत आहेत, परंतु ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही'. 

यापुर्वी कंगनाने राजकारणातील एन्ट्रीचे संकेत दिले होते. ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री गुजरात येथील द्वारका मंदिरात पोहोचली होती. अभिनेत्री देवाचे दर्शन घेतले आणि माध्यमांसोबत संवात साधला. यावेळी ती म्हणाली होती, ‘जर श्री कृष्णाची कृपा असले तर लोकसभा निवडणूक लढवेल.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना हिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘तेजस’ सिनेमा फ्लॉप ठरला. कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  ‘इमर्जन्सी’ सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. शिवाय ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाचा तिसरा भाग चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :कंगना राणौतलोकसभाबॉलिवूडसेलिब्रिटी