Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्या कानाखाली जाळ काढायचाय'; पाकिस्तानी अभिनेत्रीची कंगनावर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:21 IST

kangana ranaut: सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाह हिची मुलाखत चर्चेत येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कायम तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या घटनांसोबतच कलाविश्वात घडणाऱ्या अनेक घटनांवर तिने उघडपणे भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर तिने बॉलिवूडची अनेकदा पोलखोलही केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगत असते. परंतु, यावेळी तिच्यामुळे एक पाकिस्तानी अभिनेत्री चर्चेत आली आहे. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने कंगनाच्या कानशिलात लगावण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाह हिची मुलाखत चर्चेत येत आहे. नौशीनने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कंगनावर सडकून टीका केली आहे. इतकंच नाही तर कंगनाला मारण्याची इच्छा असल्याचंही तिने म्हटलं आहे.

नौशीनने 'हद कर दी विद मोमिन साकिब' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत केली जात होती. परंतु, 'माझी कोणासोबत तुलना केलेली मला आवडत नाही', असं म्हणाली. सोबतच 'मला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिची भेट घ्यायचीये ',असंही ती म्हणाली.

नेमकं काय म्हणाली नौशीन शाह?

"मला कंगना रणौतला भेटायचंय आणि तिच्या कानशिलात लगावून द्यायची आहे. कारण, ती कायम आमच्या देशाविषयी, आमच्या लष्कराविषयी उलटसुलट बोलत असते. तिच्या धाडसाला सलाम आहे. पण, तिला काडीचं ज्ञान नाही. तरीसुद्धा ती देशाविषयी काही ना काही बडबड करत असते. ते सुद्धा दुसऱ्यांच्या देशाविषयी", असं नौशीन म्हणाली.

पुढे ती म्हणते, "कंगना तू तुझ्या अभिनय, दिग्दर्शन या सगळ्यावर लक्ष दे. किंवा मग, वादविवाद नाही तर मग तुझा एक्स बॉयफ्रेंड यांच्यावर लक्ष दे." दरम्यान, नौशीनचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. परंतु, तिच्या या विधानावर कंगना काय उत्तर देते याकडेच सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटी