Join us

पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्यावर केला आत्महत्येचा प्रयत्न, '12th Fail' दिग्दर्शक म्हणाला- "लोणावळ्याच्या रस्त्यावर उभं राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:39 IST

दिग्दर्शनात पाऊल ठेवलं अन् पहिलाच सिनेमा फ्लॉप, डिप्रेशनमुळे आयुष्य संपवण्याचा घेतलेला निर्णय, विधू विनोद चोप्रा यांनी सांगितला कठीण काळ. 

Vidhu Vinod Chopra: 'परिंदा', '१९४२: अ लव्ह स्टोरी', 'करीब' आणि  'मिशन काश्मीर' यांसारख्या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन करणारे बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आपल्या हटके चित्रपटांसाठी ओळखले जातात. अलिकडे त्यांच्या विक्रांत मेस्सी स्टारर '१२वी फेल' या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं. दरम्यान, नुकतंच विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या एका फ्लॉप चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. त्या चित्रपटाच्या टेन्शनमुळे त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. याचा खुलासाही त्यांनी केला आहे. 

दरम्यान, विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'सजा ए मौत' हा चित्रपट साल १९८१ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पण, हा चित्रपट फ्लॉप ठरला. 'सजा ए मौ'त फ्लॉप झाल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले होते. याचा खुलासा त्यांनी 'झीरो से रिस्टार्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केला. त्यादरम्यान ते म्हणाले

"बऱ्याच लोकांचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. पण, काही वर्षांपूर्वी मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. मी खूपच डिप्रेस झालो होतो. मी त्यावेळी लोणावळा हायवेवर उभा होतो आणि रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांकडे पाहत होतो. त्यावेळी मी डिप्रेशनमुळे स्वत: चं आयुष्य संपवण्याचे विचार माझ्या मनात येत होते. परंतु, माझ्या कुटुंबीयांच्या प्रेमामुळे असा टोकाचा निर्णय घेण्याची माझी हिंमतच झाली नाही."

पुढे ते म्हणाले, "खरंतर, मला ओळखणाऱ्या लोकांपैकी बऱ्याच जणांना माझं हे बोलणं ऐकून धक्का बसेल. परंतु या गोष्टीबद्दल खुलेपणाने बोलणं गरजेचं आहे. असे विचार तेव्हा कोणाच्याही मनात आले असते. तुम्ही माणूस म्हणून आयुष्यात असंख्य संकटांना तोंड देता. या लढाईत कधी तुम्ही जिंकता तर कधी हारता. परंतु आनंद हा जिंकण्यात नाही तर सतत लढत राहण्यात आहे."

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया