हेमा मालिनी हे नाव जरी घेतलं तरी त्यांचे असंख्य सिनेमांची लिस्ट डोळ्यासमोर येते. शोले, सिता और गिता, बागबान असे कितीतरी सुपरहिट सिनेमा त्यांनी इंडस्ट्रीला दिले. जवळपास ६ दशकांपेक्षा जास्त काळापासून त्या बॉलिवूडमध्ये यशस्वीरित्या सक्रीय आहेत. आजवर त्यांचे अनेक सिनेमा गाजले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे बागबान. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या हेमा मालिनी यांचा हा सिनेमा बराच गाजला. मात्र, या सिनेमासाठी त्या पहिली पसंती नव्हत्या. त्यांच्या ऐवजी श्रीदेवी यांची प्रथम निवड करण्यात आली होती.२००३ मध्ये बी. आर. चोपडा यांचा बागबान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. उत्तम कथानक आणि त्यातील कलाकारांचा अभिनय यामुळे हा सिनेमा कलाविश्वात प्रचंड गाजला. इतकंच नाही तर आजही हा सिनेमा प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. या सिनेमातील अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. मात्र, हेमा मालिनी यांनी साकारलेली भूमिका प्रथम श्रीदेवी यांना ऑफर झाली होती. परंतु, त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांनी हा सिनेमा नाकारला. त्यानंतर ही भूमिका तब्बू, माधुरी दिक्षित या अभिनेत्रींना ऑफर झाली. मात्र, अमिताभ बच्चन यांचं वय आणि तब्बू, माधुरीचं वय कमी दिसत असल्यामुळे त्यांनीदेखील हा सिनेमा रिजेक्ट केला. त्यानंतर ही भूमिका हेमा मालिनी यांच्या पदरात पडली.
हेमा मालिनी यांनीही दिला होता नकार
हेमा मालिनी यांनी बागबानची स्टोरी ऐकल्यानंतर प्रथम नकार दिला होता. पडद्यावर ४ मुलांच्या आईची भूमिका साकारणं त्यांना मान्य नव्हतं. मात्र, हेमा मालिनी यांच्या आईने त्यांची समजूत काढल्यावर त्यांनी या सिनेमासाठी होकार दिला.
दरम्यान, बागबानच्या निमित्ताने जवळपास २० वर्षानंतर हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यापूर्वी ते १९८३ मध्ये नास्तिक या सिनेमात एकत्र झळकले होते.
Web Summary : Sridevi was initially offered Hema Malini's role in 'Baghban,' but due to scheduling conflicts, she declined. Tabu and Madhuri Dixit were also considered but deemed unsuitable due to age differences with Amitabh Bachchan. Hema Malini eventually accepted the part after initial hesitation.
Web Summary : 'बागबान' में हेमा मालिनी की भूमिका के लिए श्रीदेवी को पहले चुना गया था, लेकिन व्यस्त कार्यक्रम के कारण उन्होंने मना कर दिया। तब्बू और माधुरी दीक्षित पर भी विचार किया गया, लेकिन अमिताभ बच्चन के साथ उम्र के अंतर के कारण वे अनुपयुक्त पाई गईं। हेमा मालिनी ने शुरूआती हिचकिचाहट के बाद आखिरकार भूमिका स्वीकार कर ली।