Zareen Khan: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं.त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. याबद्दल जरीन खानच्या टीमने तिच्या आईच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला होता.या दु:खातून अभिनेत्री अजूनही सावलेली नाही.नुकतीच जरीन खानने आईच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. आईबरोबर काही क्षण शेअर करत तिने आपल्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान,२०१६ मध्ये, जरीनच्या आईवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती आणि अभिनेत्रीने तिची काळजी घेण्यासाठी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता.अलिकडेच त्यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.शिवाय अनेकदा ती चाहत्यांना त्यामुळे जरीन अनेक तिच्या आईसाठी प्रार्थना करण्यास सांगायची आणि तिच्या तब्येतीबद्दल माहिती द्यायची. अशातच आईच्या निधनानंतर अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने शब्दांतून असह्य वेदना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर झरीन खानने तिच्या आईसोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केलाय आणि तिने या पोस्टची सुरुवात अरबी ओळीने करत लिहिलंय," माझं पहिलं प्रेम, माझी आई, माझी जिवलग मैत्रीण, माझं बाळ, माझं जग, माझं सर्वस्व... तुला जाऊन १० दिवस झाले. मी जगासाठी असं मोठं कॅप्शन लिहिणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी काय यातना भोगत आहे हे तुला चांगलंच माहीत आहे."
आपले दुःख व्यक्त करत ती पुढे म्हणाली, "तुझ्या जाण्याने माझ्या हृदयात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मला तुझी खूप खूप आठवण येते." अशी मन हेलावून टाकणारी पोस्ट जरीननं लिहीली आहे. जरीनच्या या प्रवासात तिच्या आईचा तिला मोठा पाठिंबा होता. मात्र,आता आईच्या निधनामुळे अभिनेत्री पूरती खचली आहे. सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीचे चाहते तिने या दु:खातून स्वत:ला सावरावं, असं म्हणत आहेत.
Web Summary : Zareen Khan is heartbroken after her mother's recent passing. The actress shared an emotional video, expressing the irreplaceable void and immense pain caused by her mother's death. She reminisces about their bond and the support her mother provided throughout her life.
Web Summary : ज़रीन खान अपनी मां के निधन से बेहद दुखी हैं। अभिनेत्री ने एक भावुक वीडियो साझा किया, जिसमें उन्होंने अपनी मां की मृत्यु के कारण हुए अपूरणीय शून्य और अत्यधिक दर्द को व्यक्त किया। वह उनके बंधन और उनकी मां द्वारा उनके पूरे जीवन में दिए गए समर्थन को याद करती हैं।