सध्या सैफ अली खानवर हल्ला झाल्याचं प्रकरण चांगलंच गाजतंय. या प्रकरणासंबंधी विविध पैलू समोर येत आहेत. सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असून तो येत्या काही दिवसात डिस्चार्ज मिळून घरीही येईल. अशातच सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला माफी मागावी लागली आहे. सैफवर हल्ला झाल्यावर उर्वशी ट्रोल झाली होती. त्यामुळे अखेर उर्वशीला माफी मागावी लागली. काय आहे प्रकरण?
सैफवर हल्ला पण उर्वशी ट्रोल?
उर्वशीने एका मुलाखतीत सैफवर हल्ला झाल्यावर सांगितलं होतं की, "ही खूप दुर्दैवी घटना आहे. डाकू महाराज सिनेमा यशस्वी झाल्यावर माझ्या आईने मला हिरेजडीत रोलेक्स घड्याळ गिफ्ट केलं. आमच्या सिनेमाने १०५ कोटींचा व्यवसाय केलाय. तरीही आईने दिलेलं हे गिफ्ट मी खुलेआम वापरु शकत नाही. कोणी हल्ला करुन हे घड्याळ काढून घेईल याची मला भीती आहे. त्यामुळे हे खूप दुर्दैवी आहे."
या वक्तव्यामुळे उर्फीला खूप ट्रोल करण्यात आलं. प्रसंग काय आणि बोलतेय काय? इतकं असंवेदनशील कोणी कसं असू शकतं? अशा शब्दात नेटिझन्सनी उर्वशीला चांगलंच सुनावलंय. सैफ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना उर्वशीने तिच्या महागड्या घड्याळ्याबद्दल बोलताना नेटिझन्सना आवडलं नाही. अखेर उर्वशीने लांबलचक पोस्ट लिहून याप्रकरणी सर्वांची माफी मागितली. उर्वशीचा साउथ सिनेमा 'डाकू महाराज'ची चर्चा आहे.