Join us

चित्रपट सोडून टेलिव्हिजन का निवडलं? सोनाली बेंद्रेने सांगितलं खरं कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 09:17 IST

बॉलिवूड गाजवणाऱ्या सोनाली बेंद्रेने टीव्हीवर काम करण्याचा का घेतला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) बॉलिवू़डचा एक काळ गाजवला आहे. अभिनेत्रीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दरम्यान, आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही.आजही प्रेक्षक तिचे सिनेमे मोठ्या आवडीने पाहतात. मात्र, सोनाली बेंद्रेने तिच्या सिनेसृष्टी गाजवल्यानंतर टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या निर्णयाने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्याबाबत अलिकडेच अभिनेत्रीने वक्तव्य केलं आहे. 

सोनालीने 'मस्ती क्या धूम' मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. सध्या ही अभिनेत्री पती-पत्नी और पंगा हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. याचदरम्यान, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या टेलिव्हिजन शोमध्ये काम करण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. त्याविषयी बोलताना ती म्हणाली,सगळ्यांना असंच वाटत होतं की,  टीव्हीवर काम करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. परंतु हा एक चांगला शो आहे. मला या शोची कॉन्सेप्ट आवडली. शिवाय त्यातून मला मिळणारं मानधन सुद्धा चांगलं आहे. असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.

टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याच्या निर्णयाला तिचा पती गोल्डी बहल यांचा देखील मोठा पाठिंबा राहिला आहे."टेलिव्हिजन हे भविष्य आहे. येत्या काळात या क्षेत्राचा आणखी विस्तार होणार आहे", असं तिने सांगितलं. 

दरम्यान, सोनाली बेंद्रेने याआधीही बऱ्याच रिअॅलिटी शोच्या परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता लवकरच ती पती पत्नी और पंगा या शोची होस्ट म्हणून प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुनव्वर फारुकी करणार आहे. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन