Join us

सेल्फी काढायला गेले अन्...; सोनाक्षी सिन्हाची पती जहीरने अशी घेतली फिरकी; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:02 IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पती जहीरबरोबरचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

Sonakshi Sinha: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा पती जहीर इक्बाल हे जोडपं कायम चर्चेत येत असतं. लग्नानंतर ते एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. अनेकदा बऱ्याच ठिकाणी त्यांना स्पॉटही करण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या बॉण्डिंगची सुद्धा नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. सोशल मीडियावर नेहमीच दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याची कुठलीही संधी ते सोडत नाहीत. दरम्यान, अशातच सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीर यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओमध्ये जहीरचा मस्तीखोर अंदाज पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

नुकताच सोनाक्षी सिन्हाने पती जहीरबरोबरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही फ्लाइटमध्ये बसलेले दिसत आहेत. त्याचदरम्यान, जहीर दोघांचा सेफ्ली काढण्यासाठी मोबाईल हातात घेतो. त्याचक्षणी सोनाक्षी सेल्फी घेण्यासाठी पुढे येत असताना जहीर असं काही करतो ज्यामुळे अभिनेत्रीची फजिती होते. या घडल्या प्रकारामुळे जहीरला हसू अनावर होतं. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.  सोनाक्षी-जहीरच्या व्हिडीओवर चाहत्यांसह काही कलाकारांनीदेखील यावर कमेंट केल्या आहेत. 

सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली होती. गतवर्षी २३ जून २०२४ रोजी जहीर इक्बालसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त असल्याची पाहायला मिळते. 

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया