Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काय पाव्हणं आला का बाण'! साराचं जबरदस्त मराठी; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 17:39 IST

Sara ali khan: साराने मराठीमध्ये बोलत समस्त मराठी प्रेक्षकवर्गाचं मनं जिंकलं आहे.

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सारा अली खान (sara ali khan) हिचा आवर्जुन समावेश केला जातो. केदारनाथ या सिनेमातून साराने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि त्यानंतर लागोपाठ अनेक सुपरहिट सिनेमा दिले. अत्यंत कमी कालावधीत साराने मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती मराठीमध्ये बोलताना दिसत आहे.

अलिकडेच साराने झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत शिल्पा शेट्टीसुद्धा सहभागी झाली होती. या दोन्ही अभिनेत्रींनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्येच साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने मंचावर पोहोचताच थेट मराठी बोलायला सुरुवात केली.

"नमस्कार दर्शक को, मी सारा अली खान, मला इथे येऊन वाटतंय खूप छान. झी मराठी आहे महाराष्ट्राची शान. काय पाव्हणं आला का बाण", असं म्हणत साराने सुरेखरित्या मराठीत भाष्य केलं.

दरम्यान, साराचा मराठीत बोलतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सारा कायमच तिच्या नम्र स्वभावामुळे चाहत्यांचं मन जिंकत असते. साराने केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी