Radhika Sarathkumar: हिंदी चित्रपटसृष्टीत असेही काही चित्रपट आहेत ज्यांची क्रेझ आजच्या घडीला कायम आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे ऋषी कपूर यांचा नशीब अपना अपना. या चित्रपटाने या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवलं आणि रडवलंसुद्धा. त्याचबरोबर या चित्रपटात ऋषी कपूर, फराह नाझ यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान, या चित्रपटातून अभिनेत्री राधिका सरनाथ यांनी चंदो साकारुन प्रचंड लोकप्रियता मिळवली. चंदोच्या भूमिकेतील राधिका लोकांना इतकी आवडली की लोकांनी फराह नाजकडे दुर्लक्ष केले. राधिकाचा लूक, तिची बोलण्याची स्टाईल आणि हेअर स्टाइल आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. परंतु, ही अभिनेत्री तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. राधिका यांना सिनेविश्वात यश मिळालं पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक चढ–उतार पाहिले. अभिनयानंतर २००६ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
१९७९ साली आलेल्या चित्रपटातून राधिका सरनाथ यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. राधिका सरथकुमारने 'नसीब अपना अपना'शिवाय 'पराया', 'अस्ली नक्की', 'आज का अर्जुन', 'लाल बादशाह', 'जीन्स', 'रंगा', 'मारी',या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शेवटच्या त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत लाल बादशाह चित्रपटात पाहायला मिळाल्या. त्यानंतर राधिका या हिंदी चित्रपटात दिसल्या नाहीत. आता त्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अभिनयाव्यतिरिक्त राधिका सरथकुमार यांनी एका मीडिया कंपनीच्या क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणूनही काम पाहिलं आहे.
वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेत्री राहिली चर्चेत...
राधिका ही अभिनेता राजगोपालन राधाकृष्णन यांची मुलगी आहे. राधिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच लग्न करून सेटल झाली होती. १९८५ मध्ये त्यांचं पहिलं लग्न साऊथचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि निर्माता प्रताप पोथेंसोबत झालं. पण काही कारणांमुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. प्रताप पोथेनबरोबर घटस्फोट झाल्यानंतर राधिका या ब्रिटिश व्यक्तीच्या प्रेमात पडल्या. रिचर्ड हार्डी असं त्यांच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव असून लग्नानंतर ही अभिनेत्री देश सोडून लंडनला शिफ्ट झाली. 1990 मध्ये तिनं लग्न केलं. लग्नानंतर तिला रेयान हार्डी ही मुलगी झाली.
मात्र, मुलीच्या जन्मानंतर राधिकाच्या वैवाहिक आयुष्यात अनेक वादळं आली. दुसरा पती अभिनेत्रीला त्रास देऊ लागला, असं सांगण्यात येतं. त्यानंतर राधिका यांनी रिचर्डपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीसह पुन्हा भारतात परतल्या. हार्डीसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने २००१ मध्ये साऊथ अभिनेता आणि राजकीय नेता आर सरथकुमारबरोबर लग्न केलं. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विधुनगर मतदारसंगातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.