Mahima Makwana: टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे महिमा मकवाना (Mahima Makwana). सलमान खानच्या 'अंतिम - द ट्रुथ' या चित्रपटाच्या माध्यमातून महिमाने बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं. या चित्रपटात आयुष शर्मासोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या महिमा मकवानाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होऊ लागली आहे. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिचं हक्काचं घर खरेदी केलं आहे.
नुकतेचं महिमाने सोशल मीडियावर आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. महिमाने तिच्या नवीन घरातील गृहप्रवेश व पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पारंपरिक पद्धतीने पूजा करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय, "एक नवी सुरुवात, घर...!" महिमाने अगदी कमी वयात मोठं यश मिळवलं आहे. अभिनेत्रीची सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचा पाहायला मिळतोय.
वर्कफ्रंट
महिमा मकवानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. २००८ मध्ये 'मोहे रंग दे' या मालिकेत ही अभिनेत्री दिसली होती. यानंतर महिमा मकवानाने 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतून टीव्हीवर लीड अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. यानंतर अनेक शोमध्ये तिने काम केलं. सध्या महिमा मकवाना 'शोटाईम' या वेबसीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.