Join us
Daily Top 2Weekly Top 5

काजोलने सुपरहिट '३ इडियट्स' चित्रपट का नाकारला? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:22 IST

काजोलने '३ इडियट्स' चित्रपटासाठी का दिला नकार; कारण आलं समोर, म्हणाली-"तुम्ही ज्यासाठी पात्र...",

Kajol :काजोल (Kajol) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  ९० च्या काळापासून ते आतापर्यंत एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या काजोलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काजोलची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहणारी आहे. लवकरच ती ‘माँ’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी काजोलने आमिर खानचा सुपरहिट '3 इडियट्स' सिनेमा नाकारल्याचं कारण सांगितलं आहे. 

अलिकडेच 'पिंकव्हिला 'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोलने राजकुमार हिरानी यांचा '३ इडियट्स' चित्रपट नाकारल्याचं उघड केलं. या चित्रपटात प्रियाची भूमिका करीना कपूरने साकारली होती. या भूमिकेसाठी पहिल्यांदा काजोलला विचारणा करण्यात आली होती. त्याबद्दल बोलताना काजोल म्हणाली, "असं अनेकवेळा घडतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे '३ इडियट्स' चित्रपट. हा चित्रपट नाकारल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला वाटतं की, हे चित्रपट त्यांचे आहेत. अस म्हटलं जातं, तुम्ही ज्यासाठी पात्र आहात ते तुम्हाला मिळतंच. त्यामुळे मला वाटतं की मी त्या चित्रपटांशिवाय आणखीही खूप चांगलं काम केलं आहे. जर मला पटकथा आवडत नसेल तर मी कोणत्याही प्रोजेक्टला नकार देताना जास्त विचार करत नाही." असं काजोलने सांगितलं. 

दरम्यान, काजोलसोबत मॉं सिनेमात रोनित रॉय आणि इंद्रनील गुप्ता हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २७ जून रोजी हा सिनेमा भारतातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच हॉरर सिनेमात काजोलला पाहण्यात तिचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :काजोलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा