Join us
Daily Top 2Weekly Top 5

It's a Boy! गौहर खान दुसऱ्यांदा झाली आई, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Gauhar Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री, 'बिग बॉस ७' ची विजेती गौहर खानने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.नुकतंच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच गौहरने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नुकतीच सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना खुशखबर सांगितली आहे. गौहर आई झाल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

दरम्यान, गौहर खाननेसोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली आहे. १ सप्टेंबरच्या दिवशी अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला.लेकाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.  आई झाल्याबद्दल मनोरंजन विश्वातील कलाकार तसेच तिच्या अनेक चाहत्यांकडून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. 

दरम्यान, डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि जैद यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर २०२३ साली तिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. आता या जोडप्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. लग्नानंतर पाच वर्षांनी गौहर दुसऱ्यांदा आई झाली आहे. अलिकडे गौहर आणि झैदने त्यांच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. 

टॅग्स :गौहर खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया