Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गुडघ्यातून रक्तस्राव झाला, पायाला गंभीर दुखापत आणि...", नोराने सांगितला 'साकी साकी' गाण्याचा अनुभव, म्हणते - मी आजही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:35 IST

बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' अशी अभिनेत्री नोरा फतेहीची ओळख आहे.

Nora Fatehi :बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' अशी अभिनेत्री नोरा फतेहीची ओळख आहे. आपल्या अप्रतिम बेली डान्सने तिने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. नोराने तिच्या सिनेकारकिर्दीत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. 'दिलबर-दिलबर'पासून ते 'साकी-साकी' यांसारख्या गाण्यांमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. 'साकी -साकी' गाण्यावर डान्स करत नोराने आपल्या अदाकारिने चाहत्यांना घायाळ केलं. त्या एका गाण्यानं अभिनेत्रीला रातोरात स्टार बनवलं आणि त्यात तिने केलेली हुक स्टेप प्रचंड व्हायरल झाली .

या गाण्यावर नोराने डान्स केला खरा पण, त्याचे परिणाम तिला आजही सहन करावे लागत आहेत. 'साकी-साकी' गाण्यावर डान्स करून अभिनेत्रीची हालत इतकी बिघडली की त्यामुळे नोरा आजही फिजिओथेरेपी घेत आहे. अभिनेत्री नोरा फतेहीने ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतीत खुलासा केला.  'साकी-साकी' हे गाणं २०१९ मध्ये आलेल्या 'बाटला हाऊस' या सिनेमातील आहे. या सिनेमामध्ये आयटम सॉंगवर नोरा थिरकली. हे गाणं शूट करण्याआधी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं ती म्हणते. 

नोराच्या डान्सिंग कारकिर्दीला हे गाणं कलाटणी देणारं ठरलं. या आधीही नोराने बऱ्याचदा 'साकी-साकी' गाण्यावर भाष्य केलं होतं. या गाण्यामधील अवघड स्टेप्समुळे तिला गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला.  त्यामुळे अभिनेत्रीला आजही फिजिओथेरपीचा आधार घ्यावा लागतो. त्याचे परिणाम तिला आजही भोगावे लागत आहेत. 'साकी-साकी' गाण्यावर डान्स करून नोराच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. वारंवार डान्सचा सराव केल्यानं तिच्या गुडघ्याची सालं निघाली होती असं तिने सांगितलं. गुडघ्यातून रक्सस्त्राव देखील झाला होता. शिवाय नोराच्या पाठीलाही दुखापत झाल्याचं ती सांगते. त्यामुळे नोराच्या प्रत्येक सेटवर तिचा पर्सनल फिजिओथेरेपिस्ट तिच्यासोबत असतो.

सध्या नोरा फतेही तिच्या 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.या चित्रपटातील तिच्या कामामुळे सर्वत्र तिचं कौतुक होताना दिसतंय. 

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूडसेलिब्रिटी