Join us

'मैने प्यार किया'च्या सेटवर सलमान करायचा भाग्यश्रीसोबत फ्लर्ट; अभिनेत्री म्हणाली- "माझ्या बाजूला येऊन त्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:05 IST

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन प्रसिद्धीझोतात आले. 

Bhagyashree Patwardhan : १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे सलमान खान (Salman Khan) आणि भाग्यश्री पटवर्धन (Bhagyashree  Patwardhan) प्रसिद्धीझोतात आले. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुरज बडजात्या यांनी केलं होतं. 'मैंने प्यार किया'ने भाग्यश्रीला एका रातोरात सुपरस्टार बनवलं. हा सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. अशातच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही किस्से अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने शेअर केले आहेत. 

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत "मैने प्यार किया चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या खास आठवणी शेअर केल्या. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली की, 'मैने प्यार किया' चित्रपटातील 'दिल दिवाना' हे गाण्याचं शूट सुरु होतं. त्यावेळी मला असं वाटलं की सलमान माझ्यासोबत फ्लर्ट करतो आहे. पण, नंतर मला त्याच्या मनात असं काहीही नव्हतं हे समजलं. त्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमान माझ्या बाजुला येऊन बसला. त्यानंतर तो दिल दिवाना हे गाणं गुणगुणत होता. तो सेटवर नेहमीच जेंटलमनसारखा वागायचा. त्याचं वागणं खूपच चांगलं होतं."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यादिवशी मला काय घडतंय ते समजलं नाही. सलमान त्याची मर्यादा ओलांडतोय, माझ्यासोबत फ्लर्टिंग करतोय का? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जिथे कुठे जात होते त्या ठिकाणी तो मला फॉलो करत माझा पाठलाग करत होता. शिवाय गाणं सुद्धा म्हणत होता. मला वाटलं हे काय होतंय."

"मग त्यानंतर सलमान माझ्याबाजूला येऊन बसला आणि म्हणाला, मला एक गोष्ट माहिती आहे. त्यावर उत्तर देत मी म्हटलं काय माहिती आहे तुला? तेव्हा त्याने मला सांगितलं की, तू कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस हे मला माहिती आहे. मी हिमालयला खूप चांगलं ओळखतो. तू त्याला कॉल का नाही करत? असं तो म्हणाला. त्या दिवसानंतर सलमान आणि माझ्यामध्ये चांगली बॉण्डिंग निर्माण झाली." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

टॅग्स :भाग्यश्रीसलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा