Join us

अर्जून रामपाल नाहीतर 'ओम शांती ओम'साठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; का नाकारली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:09 IST

'ओम शांती ओम'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला असता 'हा'अभिनेता,'या'कारणामुळे नाकारली ऑफर

Om shanti Om Movie: फराह खान दिग्दर्शित'ओम शांती ओम'हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सुपरहिट चित्रपटातून  दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.आज इतकी वर्षे होऊनही या ओम शांती ओम ची क्रेझ काही कमी झालेली नाही. दरम्यान,  चित्रपटातील खलनायक मुकेश मेहरा या व्यक्तिरेखेचीही खूप चर्चा झाली.पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटात  मुकेश मेहराची भूमिका अर्जून रामपालपूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉला ऑफर झाली होती.

ओम शांती ओम मधील खलनायाकाच्या भूमिकेल बऱ्याच अभिनेत्यांनी नकार दिला होता. एका मुलाखतीमध्ये  फराह खानने याबाबत खुलासा केला होता. "मुकेश मेहरा यांच्या भूमिकेसाठी कास्टिंग करणं सर्वात कठीण काम होतं,कारण ती पूर्णपणे नकारात्मक भूमिका होती." असं तिने म्हटलं होतं.  फराहने या मुलाखतीत विवेकचं नाव घेतलं नव्हतं. पण, खुद्द विवेक ओबेरॉयने मुकेश मेहराची ऑफर नाकारल्याचं सांगितंल होतं. शाहरुख खानचा 'ओम शांती ओम' करण्याऐवजी त्याने 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' सिनेमाला पसंती दिली. आधीच कमिटमेंट दिल्याने आणि तारखा जुळत नसल्याने नकार दिल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.

त्यादरम्यान, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यासाठी जेमतेम एक आठवडा उरला होता आणि  या चित्रपटात मुकेश मेहराच्या स्वभावाला साजेसं असं कॅरेक्टर फराह खानला सापडत नव्हतं. त्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागली. त्यानंतर ती शाहरुखच्या नवीन वर्षाच्या पार्टीत अर्जुन रामपालला भेटली.तेव्हाच शाहरुखच्या बाथरुममध्ये अर्जुन रामपालचं कास्टिंग सेशन झालं.

टॅग्स :अर्जुन रामपालविवेक ऑबेरॉयबॉलिवूडसिनेमा