बॉलिवूड सेलिब्रिटींकडे मोठमोठ्या आलिशान गाड्या असतात. त्यांच्या गाड्या बघून आपले डोळे विस्फारतात. पण अशातच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत कोणत्याही महागड्या गाडीतून न फिरता या अभिनेत्याने चक्क स्कूटीचा आधार घेतला. मुंबईतील वांद्रे येथे हा अभिनेता बिनधास्त स्कूटीवरुन फिरताना दिसला. अभिनेत्याला अनेकांनी ओळखलंच नाही. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे टायगर श्रॉफ.
टायगर श्रॉफचा व्हिडीओ व्हायरल
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफचं फ्लाईट कॅन्सल झालं म्हणून त्याने घरी परतण्यासाठी स्कूटीचा आधार घेतला. मुंबईत ट्रॅफिक खूप जास्त असल्याने टायगरने ही शक्कल लढवली. टायगरने हूडीच्या साहाय्याने स्वतःला पूर्ण झाकलं होतं. याशिवाय कानात हेडफोन लावून टायगर निवांत स्कूटीच्या मागे बसला होता. अशा अवतारात टायगरला अनेकांनी ओळखलं नाही. अभिनेता शांतपणे स्कूटीवरुन त्याला जिथे जायचं होतं तिथे उतरला आणि त्याने स्कूटी चालवणाऱ्याचे आभार मानले.
टायगर श्रॉफचा हा साधेपणा त्याच्या चाहत्यांना खूप भावला आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय टायगर स्कूटीवर बिनधास्त फिरत होता हे अनेकांना आवडलं आहे. टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो 'बागी ४' या सिनेमात काही दिवसांपूर्वी झळकला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. टायगर श्रॉफ आता करण जोहरच्या आगामी 'लग जा गले' सिनेमात झळकणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.
Web Summary : Bollywood actor Tiger Shroff, known for his luxurious cars, was seen riding pillion on a scooter in Bandra, Mumbai, surprising many. He took this mode of transport after his flight was cancelled and to avoid traffic, covering his face with a hoodie and headphones. He will be seen in 'Lag Ja Gale'.
Web Summary : बॉलीवुड अभिनेता टाइगर श्रॉफ मुंबई के बांद्रा में स्कूटर पर पीछे बैठे हुए देखे गए। फ्लाइट रद्द होने और ट्रैफिक से बचने के लिए उन्होंने ऐसा किया। टाइगर ने अपना चेहरा हुडी और हेडफोन से ढका हुआ था। टाइगर जल्द ही 'लग जा गले' में दिखेंगे।