Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! 'बॉर्डर-२'च्या यशानंतर सनी देओलच्या 'या' सुपरहिट सिनेमाचा सीक्वल येणार? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:42 IST

मोठी अपडेट! सनी देओलच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल येणार, चाहते उत्सुक

Sunny Deol Cinema: बॉलिवूड अभिनेता सनी देओल  'बॉर्डर २' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. जवळपास २८ वर्षानंतर आलेल्या बॉर्डर सिनेमाच्या या सीक्वलला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसतेय. सनी देओलचे प्रत्येक  सिनेमे हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असतात. अशातच एकीकडे प्रेक्षकांमध्ये 'बॉर्डर २' सिनेमाची क्रेझ असताना सनी देओलच्या एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल सिनेविश्वात चर्चा रंगली आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शर राजकुमार संतोषी लवकरच घातक सिनेमाचा सीक्वल आणण्याच्या तयारीत आहेत. या आगामी प्रोजेक्टबद्दल त्यांनी सनी देओलसोबत  या प्रोजेक्टसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. इतकंच नाहीतर सनी देओलला ही कल्पना आवडली असून, राजकुमार संतोषी अभिनेत्याच्या भेटीसाठी मनालीला गेले आहेत.त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सकता निर्माण झाली आहे. याआधी सनी देओलच्या गदर आणि बॉर्डर सिनेमांच्या सीक्वलला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.  आता घातकच्या सीक्वलची माहिती येताच प्रेक्षक खुश झाले आहेत. मात्र, सनी देओलने या प्रोजेक्टसाठी होकार दिलाय की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता सनी देओल या चित्रपटाबाबत काय निर्णय घेतो, याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, 'घातक' हा ब्लॉकबस्टर सिनेमा १९९६ साली सिनेमा प्रदर्शित झाला. जवळपास ३० वर्षानंतरही हा सिनेमा प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. 'घातक'मधील काशीच्या भूमिकेतून सनी देओलने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान,गेल्या वर्षी २१ मार्चला 'घातक' चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sequel to Sunny Deol's 'Ghatak' in the works after 'Border 2' success?

Web Summary : Following 'Border 2's' success, director Rajkumar Santoshi is reportedly planning a sequel to the hit film 'Ghatak' starring Sunny Deol. Santoshi has discussed the project with Deol, who seems receptive. 'Ghatak,' originally released in 1996, remains popular.
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसिनेमा