Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय खन्नाला १० पैकी १० गुण अन् रणवीरला...; सुनील शेट्टीच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:09 IST

"अक्षयला १० पैकी १० गुण तर रणवीरला...", सुनील शेट्टीने 'धुरंधर'बद्दल दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Suniel Shetty Reaction On Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना स्टार धुरंधर या चित्रपट ५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या महिनाभरानंतरही या चित्रपटाची जादू कायम आहे. इतकेच नाहीतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आतापर्यंत या चित्रपटाने छावा सारख्या गाजेलेल्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत कमाईच्या बाबतीत त्याला मागे टाकलं आहे. आजही प्रत्येकाच्या तोंडी या सिनेमाचं नाव आहे. त्यात आता अलिकडेच अभिनेता सुनी शेट्टीने या चित्रपटाबाबतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याचा आगामी रिअॅलिटी शो भारत के सुपर फाउंडर्स मुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. याशोच्या प्रमोशन दरम्यान त्याने धुरंधर चित्रपटाबद्दल दिलेली प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी अभिनेत्याने धुरंधरचे दिग्दर्शक आदित्य धरसह रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचंही भरभरून कौतुक केलं आहे. एनडीटीव्हीसोबत संवाद साधताना अभिनेता म्हणाला,"मला वाटतं की लेखन, दिग्दर्शनाच्या बाबतीत आदित्य धर चित्रपटसृष्टीत आघाडीवर आहे.त्याची दूरदृष्टी चांगली आहे. त्याच्या लक्षात आलं की लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत, म्हणून त्याने लोकांना सांगितलं, "तुम्हाला ओटीटी पाहिजे आहे का? मी तुम्हाला त्याचा अनुभव मोठ्या पडद्यावर देईन.मी तुम्हाला मोठ्या पडद्यावर चार तासांचा खिळवून ठेवेल असा कंटेन्ट देईन, आणि लोकांना ते खूप आवडलं.शिवाय त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी सुनील शेट्टीने अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, "दोघांनीही अप्रतिम अभिनय केला आहे. यासाठी अक्षय खन्नाला १० पैकी १० देईन, कारण त्याने त्या पद्धतीचं काम  केलं आहे. पण, रणवीर सिंगला १०० गुण देईन. हा पूर्णपणे रणवीर सिंगचा चित्रपट आहे." अशी स्पष्ट शब्दांत अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty Praises Akshay, Lauds Ranveer for 'Dhurandhar' Performance.

Web Summary : Suniel Shetty praised 'Dhurandhar,' lauded director Aditya Dhar's vision. He gave Akshay Khana 10/10, but emphasized Ranveer Singh's stellar performance, calling it entirely his film. Shetty's comments sparked discussion.
टॅग्स :सुनील शेट्टीअक्षय खन्नारणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा