Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवटी बापाचं काळीज! ५ वर्षांच्या ब्रेकनंतर सुनील शेट्टीच्या मुलगा करतोय कमबॅक, लेकाचा स्ट्रगल पाहून अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:02 IST

"लोकांना वाटतं माझा मुलगा आहे,तर...",अहानला कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल सुनील शेट्टीचं वक्तव्य

Suniel Shetty On Ahan Shetty Struggle: बॉलिवूडचा अण्णा म्हणून अभिनेता सुनील शेट्टी हा ९० च्या दशकातील अॅक्शन हीरोंपैकी एक आहेत. सुनील शेट्टीने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता सुनील शेट्टीच्या पाठोपाठ मुलगा अहान शेट्टीने सु्द्धा अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. सध्या अहान शेट्टी त्याचा आगामी बॉर्डर-२ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात अहानसह सनी देओल, वरुन धवण आणि दिलजीत दोसांझ असे कलाकार देखील आहेत. मात्र, अहानचा हा प्रवास काही सोपा नव्हता. या काळात त्याला अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. नुकत्याच एका इव्हेटमध्ये सुनील शेट्टीने अहानच्या करिअरमधील संघर्षाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहानने यापूर्वी २०२१ मध्ये आलेल्या 'तडप' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता जवळपास ५ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याचदरम्यान, बॉर्डर-२ मधील एका गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अहानच्या ५ वर्षांच्या करिअरमधील ब्रेकबद्दल सांगितलं. लोकांना असं वाटतं नेपोकिड्स असल्यामुळे त्यांना इतर गोष्टी सहज मिळतात. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. अहानला देखील स्ट्रगल करावा लागला आहे.'जाते हुए लम्हों' या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटदरम्यान सुनील शेट्टी अहान शेट्टीबद्दल म्हणाला, त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर थोडा ब्रेक घ्यावा लागला. आपल्या आयुष्यात नेहमीच काही ना काही घडत असतं, पण लोकांना वाटतं की, "तो सुनील शेट्टीचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला सहज काम मिळत असेल.पण प्रत्यक्षात त्याने अनेक गोष्टींचा सामना केला आहे."

या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने मुलाच्या या आगामी चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या केल्या. तो म्हणाला,"त्याला 'बॉर्डर-२'सारखा चित्रपट मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. एका अभिनेत्याला यापेक्षा आणखी काय हवं.मला आशा आहे की,  त्याने भूमिकेला न्याय दिला असावा आणि हा चित्रपट यशस्वी ठरावा.ज्यांनी मला ही संधी दिली त्या जेपी जी यांचे मी आभार मानू इच्छितो आणि त्यांच्यामुळेच आज अहान देखील या चित्रपटात आहे." यावेळी सुनील शेट्टी मंचावर बोलताना भावुक झाल्याचा पाहायला मिळाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty emotional about Ahan's comeback after 5-year break.

Web Summary : Suniel Shetty expresses joy and emotion over son Ahan's return to films with 'Border-2' after a five-year break, acknowledging his struggles despite being a 'nepo-kid'.
टॅग्स :सुनील शेट्टीअहान शेट्टीबॉलिवूडसिनेमा