Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तोपर्यंत सिनेमा पाहणार नाही...",'या' कारणामुळे सुनील शेट्टीने घेतलीये 'बॉर्डर २' न पाहण्याची शपथ, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:35 IST

'या' कारणामुळे सुनील शेट्टीने अद्याप पाहिलेला नाही मुलाचा'बॉर्डर २' सिनेमा,स्वत:च सांगितलं कारण, म्हणाला...

Suniel Shetty On Border 2:बॉलिवूडमधील अॅक्शन चित्रपटांचा उल्लेख केला तर सुनील शेट्टी हे नाव डोळ्यासमोर येतं.बॉलिवूडचा अण्णा अशी ओळख असलेल्या सुनील शेट्टीने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्याचा लेक अहान इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. अलिकडेच अहान शेट्टीची मध्यवर्ती भूमिका असलेला 'बॉर्डर २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या चित्रपटातील त्याच्या कामाचं सगळीकडे कौतूक होताना दिसतंय. एकीकडे जगभरातून लेकाच्या चित्रपटाला वाहवाह मिळत असूनही सुनील शेट्टीने अद्याप त्याच्या मुलाचा सिनेमा पाहिलेला नाही. यामागे काय कारण आहे? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने यामागचं कारण सांगितलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अलिकडेच २३ जानेवारी  २०२६ रोजी बॉर्डर २ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड्स मोडत विक्रम रचला आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या सिनेमाचा प्रदर्शनाच्या महिनाभरानंतरही दबदबा कायम आहे. सुनील शेट्टीचा मुलगा देखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.परंतु, हा चित्रपटस जोपर्यंत ५०० कोटींपर्यंत कमाई करत नाही, तोपर्यंत आपण तो पाहणार नाही.अशी शपथ अभिनेत्याने घेतली आहे. एका मुलाखतीत सुनील शेट्टीने यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.एबीपी सोबत संवाद साधताना अभिनेता म्हणाला, मी खूप आधी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला होता, हा देशभक्तीपर चित्रपट असल्याने, तो ५०० कोटींचा टप्पा पार करायलाच पाहिजे. म्हणून मी स्वतः ठरवलं की सिनेमाने ५०० कोटी रुपये कमाई केल्यानंतरच मी हा चित्रपट पाहीन. तोपर्यंत हा सिनेमा पाहणार नाही." असं अभिनेत्याने यावेळी सांगितलं. 

त्यानंतर अभिनेता म्हणाला, "मला वाटतं, हेच एका वडिलांचं प्रेम आहे.लवकरच हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा गाठेल. मग तो म्हणाला, "हा फक्त एक विचार आहे, एक भावना आहे आणि मी त्यात अडकलो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून चित्रपटाची झलकही पाहिलेली नाही."

'बॉर्डर २' ने देशभरात किती कमाई केली?

आतापर्यंत, 'बॉर्डर २' ने ३८ दिवसांत देशभरात बॉक्स ऑफिसवर ₹३२७.४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला कमावले आहे. तर जगभरात चित्रपटाने ₹४४७.५ कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suniel Shetty vows to not watch 'Border 2' until milestone.

Web Summary : Suniel Shetty will not watch his son Ahan's 'Border 2' until it earns ₹500 crore. He calls it fatherly love. The film has grossed ₹447.5 crore worldwide.
टॅग्स :सुनील शेट्टीअहान शेट्टीबॉलिवूडसीमारेषासिनेमा