Sanjay Mishra: अभिनेते संजय मिश्रा हे हिंदी सिनेविश्वातील एक नावाजलेलं नाव आहे. 'सन ऑफ सरदार' ,'गोलमाल', 'टोटल धमाल', यांसारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आपल्या कारकिर्दीत संजय मिश्रा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.सध्या संजय मिश्रा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे नुकतीच त्यांनी मुंबईत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील मढ परिसरात सी-फेसिंग फ्लॅट खरेदी केला आहे. याच अपार्टंमेन्टमध्ये गतवर्षी प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालने फ्लॅट विकत घेतला होता. त्यामुळे आता ते गायक जुबिन नौटियालचे शेजारी झाले आहेत.
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सनुसार, संजय मिश्रा यांनी मढ आयलंडमध्ये खरेदी केलेल्या आलिशान अपार्टमेंन्टची एकूण किंमत ४.७५ कोटी इतकी आहे. संजय मिश्रा यांच नवीन घर १५ व्या मजल्यावर असून त्याचं एकूण क्षेत्रफळ १,७०१ चौरस फूट इतकं आहे., या व्यवहारासाठी मिश्रा यांनी ₹२८.५० लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी रक्कम भरली. हा व्यवहार ११ जुलै २०२५ रोजी झाल्याचा असल्याचंही सांगण्यात येत आहे. अभिनेत्याचं हे नवं घर मढ आयलंड येथील रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आहे. त्याचबरोबर जुबिन नौटियाल या अपार्टमेंटच्या ३४ व्या मजल्यावर राहतो. दरम्यान,जुबिन नौटियाल , अभिनेत्री अर्चना पुरण सिंग तसेच पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार देखील मढ आयलंडला राहतात.
संजय मिश्रा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ते घाशीराम कोतवाल या नाटकाच्या हिंदी रूपांतराच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षांनंतर ते या नाटकाच्या हिंदी रंगभूमीवर परतले आहेत.