Join us

अर्ध शूटिंगही झालं तरीही का रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' चित्रपट; काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:26 IST

एकत्र झळकले असते सलमान अन् संजय दत्त, का रिलीज झाला नाही चित्रपट? गाण्याने मोडले सगळे रेकॉर्ड 

Salman Khan And Sanjay Dutt Movie: 'साजन' आणि 'चल मेरे भाई' यांसारख्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकलेली संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सलमान खानची (Salman Khan) जोडी लोकप्रिय ठरली. सलमान खान आणि संजय दत्त हे ९० च्या दशकातील आघाडीचे अभिनेते होते. आपल्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले. परंतु, तुम्हाला माहिती आहे का संजय दत्त आणि सलमान खानचा असाच एक चित्रपट ज्याचं अर्ध शूटिंग पूर्ण होऊनही तो रिलीज होऊ शकला नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा दिवंगत अभिनेते मुकुल आनंद यांच्या खांद्यावर होती. तर तो कोणता चित्रपट होता जाणून घ्या त्याबद्दल...

सलमान आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या त्या चित्रपटाचं नाव दस असं होतं. या चित्रपटात रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास ४० टक्के शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही हा चित्रपट इंडियन बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला नाही. 

'या' कारणामुळे चित्रपट प्रदर्शित झाला नाही...

जवळपास ४० टक्के शूटिंग पूर्ण होऊनही हा सिनेमा रिलीज का झाला नाही याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.  या साल १९९७ मध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक मुकुल आनंद यांचं निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. हा एक देशभक्तीपर चित्रपट असणार होता. 

संजय दत्त-सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरीही त्यातील गाणं आजही लोकप्रिय आहे. स्वातंत्र्यदिन असो किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या चित्रपटातील गाणं हमखास लावण्यात येतं. 'सुनो गौर से दुनियावालों' असं या देशभक्तीवर आधारित गाण्याचं नाव आहे. हे गाणं एका अल्बमधील आहे असं अनेकांना वाटतं. पण, खरंतर दस चित्रपटासाठी हे गाणं लिहिण्यात आलं होतं.

टॅग्स :सलमान खानसंजय दत्तबॉलिवूडसिनेमा