Ranveer Singh: गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घरावर गोळीबार झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता आणखी धक्कादायक घटना घडली आहे. रोहित शेट्टीनंतर आता अभिनेता रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या एका व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली आहे, यात आरोपीने कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. या धमकीच्या व्हॉईसनोटनंतर रणवीरने थेट पोलिसांत तक्रार केली असून या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि आता हा व्हॉईस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा ते शोध घेत आहेत. शिवाय रणवीर सिंगला मिळालेल्या धमकीचा रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी काही थेट संबंध आहे की, ही भीती पसरवण्याचा कट आहे, पोलिस या गोष्टीचीही चौकशी करत आहे.पोलिसांचे म्हणणे आहे की, लवकरच आरोपीला पकडले जाईल. दरम्यान, या घटनेनंतर रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सध्या रणवीर सिंह 'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. लवकरच त्याचा धुरंधर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच अभिनेत्याला धमकी देण्यात आली आहे. याआधी देखील बॉलिवूडमधील काही कलाकारांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणानंतर रणवीरला धमकी मिळाल्याने पुन्हा एकदा कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Summary : Ranveer Singh received a death threat via WhatsApp voice note demanding extortion money. He filed a police complaint, leading to an investigation and increased security at his residence. The threat follows a recent shooting at Rohit Shetty's house, raising concerns about Bollywood artists' safety.
Web Summary : रणवीर सिंह को व्हाट्सएप पर जान से मारने की धमकी मिली और फिरौती की मांग की गई। उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद जांच शुरू हो गई और उनके आवास पर सुरक्षा बढ़ा दी गई। रोहित शेट्टी के घर पर हाल ही में हुई गोलीबारी के बाद यह धमकी मिली है, जिससे बॉलीवुड कलाकारों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।