Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुरुंगात सिगारेट पिण्यासाठी व्यवस्था असावी..."; राजपाल यादवने केली भलतीच मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:57 IST

तिहार तुरुंगात १० दिवस घालवल्यानंतर राजपाल यादव यांना जामीन मिळाला आहे. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेल्या एका मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या त्यांच्या जामिनामुळे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आहेत. सुमारे ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात १० दिवस घालवल्यानंतर राजपाल यादव यांना जामीन मिळाला आहे. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेल्या एका मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "रेल्वे स्टेशन आणि विमानतळांप्रमाणे तुरुंगातही कैद्यांसाठी स्वतंत्र 'स्मोकिंग झोन' असावा," अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

स्मोकिंग झोनची मागणी का?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजपाल यादव यांनी तुरुंगातील अनुभवांवर भाष्य केले. ते म्हणाले की, "मी स्वतः सिगारेट पिण्याच्या सवयीपासून दूर राहू शकलो नाही. अनेकदा प्रयत्न करूनही मी ही सवय सोडू शकलो नाही. तुरुंगात असताना मला जाणवले की, तिथे अशी कोणतीही जागा नाही जिथे कैदी धूम्रपान करू शकतील. ज्याप्रमाणे विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर स्मोकिंग झोन असतात, तसेच तुरुंगातही असायला हवेत."

राजपाल यादव यांनी हे देखील स्पष्ट केले की, ते तंबाखू किंवा धुम्रपानाचे समर्थन करत नाहीत. "मला माहित आहे की हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण देशात तंबाखूची विक्री कायदेशीररीत्या सुरू आहे आणि त्यातून मोठा व्यवसाय होतो. त्यामुळे जे लोक ही सवय सोडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी तुरुंगात योग्य व्यवस्था असायला हवी," असे त्यांनी नमूद केले.

केवळ स्मोकिंग झोनच नाही, तर राजपाल यादव यांनी तुरुंग प्रशासनात सुधारणा करण्यावरही भर दिला. ते म्हणाले, "तुरुंगाने केवळ शिक्षा देण्याचे केंद्र न राहता 'सुधारगृह' म्हणून काम केले पाहिजे. तिथे कैद्यांना स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळायला हवी. अनेकदा माणून एका चुकीमुळे तुरुंगात जातो, पण बाहेर येताना तो अधिक चांगला माणूस म्हणून बाहेर यायला हवा."

काय आहे प्रकरण?

राजपाल यादव यांना २०१० मधील एका जुन्या कर्ज प्रकरणामुळे आणि चेक बाऊन्समुळे तुरुंगात जावे लागले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला असून १.५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादव त्यांच्या मूळ गावी, शहाजहानपूर येथे पोहोचले असून तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav requests smoking zones in prisons after jail release.

Web Summary : Actor Rajpal Yadav, after release from jail for a check bounce case, surprisingly demanded smoking zones in prisons, similar to those at airports and railway stations, for inmates who can't quit smoking. He also advocated for prison reforms.
टॅग्स :राजपाल यादवबॉलिवूडतुरुंगधोकेबाजी