Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! 'लव्हयापा'मध्ये काम करण्यास जुनैद खानने दिलेला नकार; म्हणतो-"या भूमिकेसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:41 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या प्रसिद्धीझोतात आला आहे.

Junaid Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या प्रसिद्धीझोतात आला आहे. लवकरच जुनैद 'लव्हयापा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ‘लव्हयापा’ हा थिएटरमध्ये रिलीज होणारा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये 'द आर्चिज' फेम खुशी कपूरदेखील असणार आहे. याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. यानिमित्ताने  संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याची पाहायला मिळतेय. जुनैद खान आणि खुशी कपूर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. दरम्यान, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये जुनैद खानने सुरुवातीला 'लव्हयापा'मध्ये मुख्य भूमिकेत काम करण्यास नकार दिला होता, असं सांगितलं. त्याच्या या विधानाने अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 

जुनैद खान कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या 'इंडियन एक्सप्रेस'ला एका मुलाखतीत अभिनेत्याने 'लव्हयापा' चित्रपट करण्यास नकार दिला होता, असं सांगितलं. यामागे नक्की काय कारण होतं. याबद्दल त्याने खुलासा देखील केला आहे. त्यादरम्यान, मुलाखतीत जुनैद खान म्हणाला, "मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं कारण निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी माझी निवड केली होती. खरंतर खऱ्या आयुष्यात माझी पर्सनॅलिटी या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे." 

पुढे जुनैद खान म्हणाला, "त्यानंतर मी अव्दैत चंदन यांना विचारलं की, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी या भूमिकेसाठी योग्य आहे? खरं सांगायचं झालं तर मी या भूमिकेसाठी परफेक्ट नाही, असं मला वाटतं. परंतु त्यांचा आणि मधू मंटेना सर यांचा माझ्यावर विश्वास होता." असा खुलासा जुनैद खानने केला.

दरम्यान, 'लव्हयापा' सिनेमात जुनैद खान, खुशी कपूर आणि आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका दिसतेय. याशिवाय कॉमेडियन किकू शारदाही सिनेमात खास भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज होतोय.

टॅग्स :जुनैद खानखुशी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा