Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जवळपास २० वर्षापूर्वी...", हृतिक रोशनने Ex पत्नी सुझैन खानसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट चर्चेत, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:35 IST

अभिनेता हृतिक रोशन हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

Hrithik Roshan: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'वॉर-२' मुळे प्रचंड चर्चेत आहे. ग्रीकगॉड या नावाने सर्वत्र परिचित असलेला हा अभिनेता त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. हृतिक रोशन आणि सुझैन खान यांनी अगदी काही वर्षांपूर्वीच लग्नगाठ बांधली. परंतु काही कारणामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या ते दोघेही त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. अशातच सोशल मीडियावर हृतिक रोशनने पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खानचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत.

नुकताच सोशल मीडियावर हृतिकने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओला भलमोठं कॅप्शन देत अभिनेत्याने सुझैन खानचं भरभरुन कौतुक केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. दरम्यान, सुझैन खानने लक्झरीयस इंटिरिअर डिझायनर ब्रॅंड 'चारकोल प्रोजेक्ट' नावाचं नवीन स्टोअर हैदराबाद येथे सुरु केलं आहे. याचनिमित्ताने अभिनेत्याने सुझैन खानच्या नव्या स्टोअरची झलक चाहत्यांसोबत शेअर करत तिची स्तुती केली आहे. या पोस्टला सुंदर असं कॅप्शन देत हृतिकने लिहिलंय,"स्वप्न ते वास्तव... सुझैन तुझा खूप अभिमान वाटतो. मला आठवतंय २० वर्षांपूर्वी ही एक अशी संकल्पना होती ज्याबद्दल तू स्वप्न पाहत होतीस."

पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "आज तू हैदराबाद येथे तुझा दुसरा चारकोल प्रकल्प सुरू करत आहेस. त्यामुळे मला त्या मुलीचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही जिने काही वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहण्याचं धाडस केलं होतं. यामागे तुझी मेहनत तर आहेच शिवाय तुझं टॅलेट देखील यातून दिसत आहे. हैदराबाद येथील तुझ्या स्टोअरमधील डिझाईन आणि प्रेझेंटेशन पाहून मी दंग राहिलो. तुम्हा सर्वांना खूप यश मिळो...", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. 

दरम्यान, हृतिक रोशन आणि सुझैन खान हे कपल बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणलं जायचं. परंतु काही मतभेदांमुळे हृतिक- सुझैन यांनी घटस्फोट घेतला आणि आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. हे दोघे जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. 

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया