Join us

करिष्मा कपूरने वाचवले होते पाण्यात बुडणाऱ्या सहकलाकाराचे प्राण, ३३ वर्षानंतर अभिनेत्याने केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:52 IST

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करिष्मा कपूरने तिच्या सहकलाकाराचे प्राण वाचवले होते. 

Karishma Kapoor : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने तसेच सौंदर्याने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. वयाच्या १७ व्या वर्षी तिने  सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'प्रेम कैदी' या चित्रपटाच्या माध्यमातून करिष्माने बॉलिवूडमध्ये डेब्यू  केला. या चित्रपटामध्ये अभिनेता हरिश कुमार देखील मुख्य भूमिकेत  होता.  जवळपास ३३ वर्षानंतर हरिशने या चित्रपटाच्या शूटिंग वेळी घडलेल्या एक प्रसंगावर भाष्य केलं आहे. शूट करताना एका सीन दरम्यान अभिनेता पाण्यात बुडला होता.

शुटिंगवेळी पाण्यात बुडालेला हा अभिनेता- 

इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत हरिश कुमारने 'प्रेम कैदी' सिनेमाचं शूटिंग करताना घडलेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला. तो म्हणाला, 'या चित्रपटात एका सीन होता, ज्यामध्ये मी करिष्माला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो. ज्या क्षणी करिष्मा स्विमिंगपुलमध्ये उडी मारते त्याच वेळी मी तिला वाचण्यासाठी धावत जातो. पण खरं तर तिला वाचवण्यासाठी मी पाण्यात उडी मारली. पण मी तिला वाचवण्याऐवजी करिष्मानेच मला मरता-मरता वाचवलं'. 

अभिनेता म्हणतो, 'सिनेमाचं शूटिंग करताना मी स्विमिंग पुलमध्ये बुडणार होतो. तिथे जमा असलेल्या प्रत्येकाला वाटलं की मी गंमत करत आहे. पण मला पोहता येत नसल्याने मी पाण्यात बुडू लागलो.  पण करिष्माच्या लक्षात येताच तिने मला पाण्यातून बाहेर काढलं', असा खुलासा अभिनेत्याने केला.

टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी