Join us
Daily Top 2Weekly Top 5

९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा! बजेटपेक्षा तीन पट जास्त केलेली कमाई, आता २७ वर्षांनी येतोय सीक्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:45 IST

२ तास २७ मिनिटांचा सिनेमा कॉमेडी अन् अॅक्शनने प्रेक्षकांना घातलेली भुरळ,  २७ वर्षानंतर येतोय सीक्वल

Bollywood Cinema: सध्या बॉलिवूडमध्ये जुन्या चित्रपटांच्या सीक्वलचा ट्रेंड सुरु झाला आहे. याला प्रेक्षकांचा देखील  उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.याचे ताजे उदाहरण म्हणजे बॉर्डर २. दरम्यान, या वर्षी अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे सिक्वेल थिएटरमध्ये दाखल होणार आहेत.सनी देओलचा 'बॉर्डर २' नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर 'धुरंधर २', 'कॉकटेल २', 'आवारापण २' आणि 'पती पत्नी और वो दो' हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. अशातच आता ९० च्या दशकातील गोविंदाच्या एका गाजलेल्या चित्रपटाबाबत अपडेट समोर आली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

एकीकडे हार्डकोर अ‍ॅक्शन चित्रपटांची चलती असताना, ९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.  या चित्रपटाचं नाव म्हणजे हसीना मान जाएगी. डेव्हिड धवन दिग्दर्शित हसीना मान जाएगी हा सिनेमा साल १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गोविंदा, संजय दत्तसह करिश्मा कपूर, पूजा बत्रा असे तगडे कलाकार होते. विशेष  म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वेलवर कामही सुरू झालं आहे आणि दिग्दर्शकाबद्दल महत्त्वाची माहितीही मिळाली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, यावेळी फरहाद सामजी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची अपडेट मिळते आहे. शिवाय सध्या या पटकथेवर काम वेगाने सुरू आहे.

डेव्हिड धवन दिग्दर्शित 'हसीना मान जायेगी' हा कॉमेडी ॲक्शन चित्रपट होता.१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त ९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने जगभरात २७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता जवळपास २७ वर्षानंतर या गाजलेल्या सिनेमा येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 90s Blockbuster 'Haseena Maan Jaayegi' Sequel Coming After 27 Years!

Web Summary : Govinda and Sanjay Dutt's 'Haseena Maan Jaayegi' sequel is in the works. The 1999 hit, directed by David Dhawan and made for ₹9 crore, earned ₹27 crore. Farhad Samji may direct the new film.
टॅग्स :गोविंदाकरिश्मा कपूरबॉलिवूडसिनेमासंजय दत्त