Join us

इम्रान हाश्मीचे किसींग सीन पाहून पत्नीची अशी असायची प्रतिक्रिया! अभिनेता म्हणाला- "सुरुवातीला ती मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:05 IST

इम्रान हाश्मीचे किसींग सीन पाहून पत्नीची अशी असायची प्रतिक्रिया! अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा

Emraan Hashmi:बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला (Emraan Hashmi) कोणत्याही परिचयाची गरज नाही. इमरान हाश्मी हा त्याच्या हटके भूमिकांसाठी आणि उत्तम चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे अभिनेत्याला सिरियल किसर असं म्हटलं गेलं. एक काळ असा होता जेव्हा हा अभिनेता त्याच्या बहुतेक चित्रपटांमध्ये फक्त 'लव्हर बॉय'ची भूमिका साकारताना दिसत होता. परंतु तुम्हाला माहिती आहे का की मोठ्या पडद्यावर छान भूमिका साकारल्यामुळे या अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्या भूमिकांविषयी भाष्य केलं आहे. 

नुकत्याच 'रेडिफ' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मीने सिरीयल किसर टॅग आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलला. त्यावेळी अभिनेत्याने म्हटलं, "जेव्हा लोक मला सिरीयल किसर म्हणून ओळखणं ते मला अजिबात आवडत नाही. मी यावर अनेकदा आक्षेप घेतला आहे, पण आपण काहीच शकत नाही."

पुढे अभिनेत्याने सांगितलं, "चित्रपटांमधील त्या सीन्समुळे माझ्या कुटुंबीक जीवनावर परिणाम झाला. तसंच माझी पत्नी परवीन किसींग सीन पाहून रागवायची. सुरुवातीला अनेक समस्या आल्या, माझ्या वडिलांनाही हे सर्व आवडलं नाही. पण, एक अभिनेता म्हणून तुमच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. त्यानंतर सर्व काही चांगलं झालं आणि आता या सगळ्याची सवय होत गेली."असा खुलासा अभिनेत्याने केला. 

इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अलिकडेत तो 'ग्राऊंड झिरो' सिनेमात पाहायला मिळाला. या चित्रपटात त्याने केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. 

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा