Ground Zero Trailer: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत येत असतो. नेहमीच त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. रोमँटिक भूमिका यशस्वीरित्या केल्यानंतर तो देशभक्तीपर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या 'ग्राउंड झिरो' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात तो बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. शिवाय तो 'ग्राउंड झिरो' मध्ये मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरबरोबर काम करताना दिसणार आहे.
'ग्राउंड झिरो' हा चित्रपट २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. सोशल मीडियालवर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. "एक चेहरा नसलेला शत्रू अन् एक निर्भय अधिकारी, शोधकार्य सुरु..." असं कॅप्शन देत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना अनेक देशभक्तीवर संवाद ऐकायला मिळतात. शिवाय ट्रेलरमध्ये इमरान हाश्मीचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावून गेले आहेत
'ग्राउंड झिरो'च्या ट्रेलरमध्ये इमरान हाश्मीचे अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या या नव्या सिनेमासाठी चाहतेही उत्सुक आहेत.