Anil Kapoor:बॉलिवूडचा झक्कास अभिनेता म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते अनिल कपूर यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची तसेच विनोदी भूमिका साकारल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ते या क्षेत्रात सक्रिय आहेत आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सध्या अनिल कपूर हे सुबेदार या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनिल कपूर यांनी यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, तुम्हाला माहितीये का अभिनेत्याला त्यांच्या १८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटासाठी आजही पैसे मिळतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
दरम्यान, 'इंडिया टुडे' एका कार्यक्रमामध्ये अनिल कपूर यांनी त्यांचा अभिनय प्रवास तसेच इतर काही गोष्टींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी २००८ च्या ऑस्कर विजेत्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना अजूनही (रॉयल्टी) पैसे मिळत असल्याचं त्यांनी उघड केलं. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, "मला हे तुमच्यासोबत शेअर करायची आहे. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. दीड दशकाहून अधिक काळ लोटला आहे आणि कालच मला 'स्लमडॉग मिलेनियर' च्या कामासाठीचा चेक मिळाला आहे."
त्यानंतरअनुल कपूर मिळालेल्या रकमेचा खुलासा करत म्हटले, "काल, मला ३,००० पाउंड (३.५ लाख रुपये) मिळाले. मी माझे सर्व कर भरतो, म्हणून मी म्हणू शकतो की मला सुमारे अर्धा दशलक्ष पाउंड म्हणजे मला सुमारे ६ कोटी रुपये मिळणार आहेत. तर, मी करोडपती आहे. मी ते मागितले नव्हते. त्यांनी स्वत: ते मला दिले आहेत."
'या' कारणामुळे केला होता चित्रपट
यावेळी अभिनेत्याने डॅनी बॉयल यांच्या चित्रपटात काम करण्याचं कारणही सांगितलं.ते म्हणाले, "मी स्वतःला काहीतरी नवीन गोष्टी शिकता याव्यात याकरिता तो चित्रपट केला. तेव्हा मला खूप काही शिकायचं होतं आणि म्हणूनच मी आजही इंडस्ट्रीत टिकून आहे." त्यांनी पुढे म्हटलं, "त्यावेळी त्यांनी मला सांगितलं ते माझा पैसे देऊ शकत नाहीत. तेव्हा मी म्हणालो होता 'मी पैसे मागितले का?' मी हे काम पैसे न घेताच करेन." असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
डॅनी बॉयल दिग्दर्शितचित्रपटात इरफान खान, अनिल कपूर, रुबिना अली, आयुष खेडेकर, तनय छेडा, अझरुद्दीन इस्माईल, तन्वी लोणकर, मधुर मित्तल, सौरभ शुक्ला आणि महेश मांजरेकर अशा दमदार कलाकारांची फळी होती. विकास स्वरूप यांच्या "क्यू अँड ए" या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अनिल कपूरन यांनी गेम शो होस्ट प्रेम कुमारची भूमिका साकारली होती.
Web Summary : Anil Kapoor reveals he still receives royalties from 'Slumdog Millionaire,' earning ₹3.5 lakhs recently. He initially did the film for the experience, not money, which has kept him relevant. He received around ₹6 crore till now.
Web Summary : अनिल कपूर ने खुलासा किया कि उन्हें 'स्लमडॉग मिलियनेयर' से अभी भी रॉयल्टी मिलती है, हाल ही में ₹3.5 लाख कमाए। उन्होंने शुरू में यह फिल्म अनुभव के लिए की थी, पैसे के लिए नहीं, जिससे उन्हें प्रासंगिकता बनाए रखने में मदद मिली। अब तक लगभग ₹6 करोड़ मिले।