Join us

डॉक्टरांनी सोडलेली आशा, मृत्यूच्या दाढेतून परतलेले अमिताभ बच्चन, 'ती' एक चूक पडलेली महागात! काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:50 IST

मृत्यूच्या दाढेतून परतलेले अमिताभ बच्चन, 'ती' एक चूक पडलेली महागात! काय घडलेलं?

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. गेल्या चार दशकांपासून ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बिग बींनी केवळ भारतातच नाही तर आपल्या डॅशिंग अंदाजाने जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत दिवार, शोले, डॉन, त्रिशुल तसेच अमर अकबर अॅंथनी या चित्रपटांमध्ये काम केलं. १९७०- ८० चा काळ त्यांनी गाजवला. त्यांचा प्रत्येक सिनेमा हा सुपरहिट ठरला. मात्र, अशाच एका चित्रपटाचं शूटिंग करताना बिग बींना मोठी दुखापत झाली होती. त्यावेळी ते जीवन-मरणाच्या दारातून ते परत आले होते. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...

काय घडलेलं?

१९८२ मध्ये 'कुली' चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यावेळी दिग्दर्शकांनी सांगितल्यानुसार पुनीत इस्सर यांना अमिताभ यांच्या तोंडावर बुक्का मारायचा होता आणि त्यांना टेबलवर पडायचे होते. हा सीन अमिताभ यांच्या बॉडी डबलसोबत करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, बिग बींना हे मान्य नव्हतं. त्यांना या सीनला रिअल टच द्यायचा होता. यामुळे हा सीन त्यांनी स्वतः करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण सीन शूट झाला, लोक टाळ्या वाजवू लागले. परंतू त्याचदरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या पोटात वेदना सुरु झाल्या.

'कुली' मधील तो अॅक्शन सीक्वेंस करताना नकळतपणे पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोटात जोरदार मुक्का मारला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी ते बरे होण्याची आशा सोडली होती. ‘कुली’ या सिनेमाच्या सेटवर अमिताभ यांना झालेल्या अपघातानंतरही जगभरातील चाहत्यांनी देवाकडे अशाच प्रार्थना केल्या होत्या.

त्या अपघातानंतर त्यांच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना बरे व्हायला अनेक महिने लागले. मात्र,याच काळात त्यांनी हेपेटायटीस बीची लागण झाली होती. अमिताभ बच्चन सध्या ठिक आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी