Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब आएगा मजा! बहुचर्चित 'गोलमाल ५' मध्ये 'हा' बॉलिवूड सुपरस्टार एन्ट्री घेणार? अजय देवगणला देणार टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:07 IST

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल ५' मध्ये 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार खलनायक

Bollywood Movie:बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आले ज्याच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यापैकीच एक नाव म्हणजे गोलमाल चित्रपट. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या फ्रॅंचायझीचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.  दरम्यान, या चित्रपटाचे पहिले चार भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. त्यानंतर गोलमाल चित्रपटाचा पाचवा भाग कधी येणार याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते.लवकरच गोलमाल चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात आता गोलमाल ५ बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल फ्रँचायझीच्या पाचव्या भागावर अधिकृतपणे काम सुरू झाले आहे. आता,या चित्रपटात एका बॉलिवूड सुपरस्टारची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जातं आहे. 'गोलमाल ५' मध्ये एका बॉलिवूड सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे. इंग्रजी वेबसाइट व्हरायटीच्या वृत्तानुसार, सुपरस्टार अक्षय कुमार गोलमाल ५ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळते आहे. चित्रपटात अक्षय आणि अजय एकमेकांना भिडताना दिसणार आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा चित्रपट मनोरंजनाचं एक पॅकेज असणार आहे. 

गोलमाल ५ मध्ये अक्षय कुमार आणि अजय देवगण एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा त्यांच्या कारकिर्दीतील सहावा चित्रपट असेल, ज्यामध्ये ते एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांनी यापूर्वी सुहाग (१९९४), खाकी (२००४), इन्सान (२००५), सूर्यवंशी (२०२१) आणि सिंघम अगेन (२०२४) मध्ये एकत्र काम केले आहे.गोलमाल फ्रॅंचायझीमध्ये अजय देवगणसह करीना कपूर, अर्शद वारसी, शर्मन जोशी, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar rumored to join Golmaal 5, clash with Ajay Devgn.

Web Summary : Akshay Kumar is reportedly set to join Golmaal 5 as a villain, potentially clashing with Ajay Devgn. This marks their sixth collaboration. The film will also feature Kareena Kapoor and others.
टॅग्स :अक्षय कुमारअजय देवगणरोहित शेट्टीबॉलिवूडसिनेमा