Akshay Kumar Car Accident:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करुन सोमवारी मुंबईत परतले. मात्र,घरी परताना एक मोठी दूर्घटना घडली. मुंबईतील जुहू परिसरात मुक्तेश्वर रोडजवळ सोमवारी रात्री सुमारे ८:३० वाजता अभिनेत्याच्या ताफ्यातील सुरक्षा कारने एका ऑटो रिक्षाला धडक दिली. ज्यामुळे मोठा रस्ते अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की ऑटो चालक आणि त्यात बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता त्या ऑटोचालकाच्या भावाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून त्याने आपल्या जखमी भावासाठी मदतीची मागणी केली आहे.
जखमी ऑटोचालकाचा भाऊ मोहम्मद समीर एएनआयशी बोलताना म्हणाला, ही घटना सोमवारी रात्री सुमारे ८:३० च्या सुमारास घडली. माझा भाऊ ऑटो चालवत होता. त्याचवेळी त्याच्यामागे अक्षय कुमारची इनोव्हा कार आणि एक मर्सिडीज धावत होती. तेव्हा मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली आणि इनोव्हा पुढे जाऊन ऑटोला धडकली. या धडकेमुळे ऑटो उलटला,त्यामुळे माझा भाऊ आणि ऑटोमध्ये बसलेला एक प्रवासी ऑटोखाली अडकले. ऑटो पूर्णपणे तुटला आणि सध्या माझा भाऊ रुग्णालयात असून त्याची प्रकृती खूप गंभीर आहे.
यापुढे समीरने सांगितलं, "आमची फक्त एवढीच मागणी आहे की , माझ्या भावावर योग्य ते उपचार व्हावेत आणि ऑटोचे जे नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई मिळावी. याव्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीही नको.आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला हे इतका खर्च करणं शक्य होणार नाही, परिस्थिती खूप गंभीर आहे.आमच्या भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा,एवढीच आमची इच्छा आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या मर्सिडीजने ऑटो रिक्षाला जोरदार धडक बसली. त्यामुळे रिक्षाचालकासह त्यातील प्रवासीही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मर्सिडीज चालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि बेदकारपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : An auto-rickshaw driver was critically injured after being hit by a security car in Akshay Kumar's convoy in Juhu. The driver's brother pleads for medical assistance and compensation.
Web Summary : जुहू में अक्षय कुमार के काफिले में एक सुरक्षा कार की टक्कर से ऑटो-रिक्शा चालक गंभीर रूप से घायल हो गया। चालक का भाई चिकित्सा सहायता और मुआवजे की गुहार लगा रहा है।