Join us

मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा होणार कल्ला! अजय देवगणसह 'धमाल ४'मध्ये 'हे' कलाकार झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:26 IST

प्रतीक्षा संपली! तीन भागांच्या यशानंतर प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'धमाल-४'; रिलीज डेट आली समोर 

Ajay Devgn: बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांचे सीक्वल गाजले, त्यापैकी एक म्हणजे 'धमाल'. पहिल्या तीन भागांच्या यशानंतर प्रेक्षकांना खळखळवून हसवायला धमाल फ्रॅंचाइजीमधील चौथा लवकरच भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि अरशद वारसी स्टार  'धमाल-४' चित्रपटाबद्दल आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजय देवगणने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. यासोबतच चित्रपटातील कलाकारांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत.

नुकतीच अभिनेता अजय देवगणने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टद्वारे अभिनेत्याने धमाल-४ च्या प्रदर्शनाबाबत खुलासा केला आहे. 'धमाल-४'च्या माध्यमातून अजय देवगण, अरशद वारसी आणि रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवी किशन हे कलाकार आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले आहे. "आज की ताजा खबर, गैंग द्वारा आपके लिए लाया गया, जो अब जल्दी ही लूटने आ रहे हैं आपका दिल और दिमाग, धमाल 4 ईद 2026 पर सिनेमाघरों में आएगी...", असं कॅप्शन अजय देवगणने या पोस्टला दिलं आहे. या पोस्टमध्ये पाहायला मिळतंय की,सर्व कलाकारांचे फोटो एका वर्तमानपत्रात आले आहेत. ज्याचं नाव 'धमाल टाईम्स' आहे. त्यासोबतच प्रत्येक कलाकाराच्या पात्राबद्दल हिंट देण्यात आली आहे.धमाल चित्रपटाचा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला.त्यानंतर,२०११ मध्ये डबल धमाल आणि २०१९ मध्ये टोटल धमाल प्रदर्शित झाला. त्यामुळे चौथ्या भागात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,'धमाल ४' मध्ये रवी किशन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.या पोस्टरमधून त्याचा लूक देखील समोर आला आहे.त्यांच्याशिवाय, या चित्रपटात संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, ईशा गुप्ता, संजीदा शेख आणि अंजली आनंद हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येईल. 

टॅग्स :अजय देवगणरितेश देशमुखअर्शद वारसीबॉलिवूडसिनेमा