Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कपिल शर्मा शो'वर आमिर खान नाराज; 'या' कारणामुळे कपिलचाही घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 08:50 IST

Aamir khan: आमिर आणि कपिल यांनी एका पंजाबी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी आमिरने कपिलवर असलेली नाराजी व्यक्त केली.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) काही काळासाठी सिनेमांमधून ब्रेक घेतला आहे. मात्र, सोशल मीडियावर तो कायम चर्चेत येत असतो. अलिकडेच आमिरने एका पंजाबी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याच्यासोबत कॉमेडियन, अभिनेता कपिल शर्मादेखील उपस्थित होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात असं काही घडलं ज्यामुळे आमिर, कपिलवर नाराज झाला आणि त्याने कपिलसह त्याच्या शोवरही नाराजी व्यक्त केली.

आमिर आणि कपिल यांनी 'कॅरी ऑन जट्टा 3' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी गप्पा मारत असतानाच आमिरने कपिलवर असलेली नाराजी व्यक्त केली. परंतु, ही नाराजी खरोखर नसून मस्करीचा भाग होता.

कपिलवर का नाराज आहे आमिर?

प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी  यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आमिरने कपिलवर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. "मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी कपिल शर्माला फोन केला होता. मी आजकाल काम कमी करतोय. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतोय. मला कॉमेडी शो पाहायला खूप आवडतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी मी काही ना काही विनोदी कार्यक्रम पाहून झोपतो. गेल्या काही महिन्यांपासून मी कपिल शर्मा शो पाहतोय. मी या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहता झालोय", असं आमिरने म्हटलं.

पुढे तो म्हणतो, "माझ्या अनेक संध्याकाळ या कार्यक्रमामुळे खास झाल्या आहेत. त्यामुळे मी कपिलला फोन करुन त्याचे धन्यवाद मानले. तुम्ही एवढ्या लोकांचं मनोरंजन करताय त्यासाठी थॅक्यू. लोकांचं मनोरंजन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आज तुला इथे पाहून मला खूप आनंद होतोय. मी तुझा सगळ्यात मोठा चाहता आहे. पण, अजूनपर्यंत तू मला तुझ्या शो मध्ये बोलवलं नाहीस? तू काही बोलायच्या आतच मी हे सांगतोय."

दरम्यान, आमिरचं हे बोलणं ऐकल्यानंतर कपिलनेही त्याला त्याच्या कार्यक्रमात येण्याची विनंती केली. ''ज्या दिवशी तुम्ही आमच्या कार्यक्रमात याल तो दिवस आमच्यासाठी भाग्याचा असेल. कधीही आमिर भाईंसोबत भेट होते ती अशी गडबडीमध्येच होते. बऱ्याचदा त्यांच्याशी याविषयी बोलायचा प्रयत्न केला. पण, मी जरा घाईत आहे. नंतर आल्यावर बोलू. पण त्यानंतर ३ वर्षांनंतर ते भेटतात'', असं कपिल म्हणाला. 

टॅग्स :आमिर खानकपिल शर्मा टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा