Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: "एकच ध्यास, जनतेचा विकास", मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:24 IST

कंगना रणौतने तिचा मतदारसंघ मंडीमध्ये पहिला रोड शो केला. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना कंगनाने जोरदार नारे लगावले

कंगना रणौत ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंगनाला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी भागातून निवडणुकीला उभी आहे. यानिमित्ताने कंगनाने पहिल्यांदाच तिच्या मतदारसंघात रोड शो करुन जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कंगनाने जोरदार नारे लगावले. "मी कोणी अभिनेत्री नाही, तर तुमची मुलगी आहे", असं कंगना लोकांना म्हणाली. सविस्तर पाहा.

कंगनाने एका ओपन जीपमध्ये भव्य रोड शो केला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल की कंगनाच्या आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी दिसतेय. मीडियाशी संवाद साधताना कंगना रणौत म्हणाली, "तुम्ही बघू शकता की किती गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत आणि किती लोकांना अभिमान आहे की, मंडीची मुलगी देशाचा आवाज बनून निवडणुकीत मंडीचं प्रतिनिधित्व करतेय."

कंगना रणौत पुढे म्हणाली, "विकास हा आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय भाजपचे नेतृत्व आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आम्ही त्यात कोणतीही कसर ठेवणार नाही. सध्याच्या काळात आमचं काय अस्तित्व आहे हे लोकं आम्हाला दाखवतीलच." अशा शब्दात कंगनाने मीडिया आणि जनतेशी संवाद साधला

टॅग्स :कंगना राणौतनरेंद्र मोदी